पंतप्रधान मोदी देशातील जनतेची किती काळजी घेतात हे वेळोवेळी समोर येत असते. कधी कधी ते रिक्षां चालकांची मदत करतात तर कधी बिहारच्या जीविका बहिणींच्या कार्याचे कौतुक करतात तर कधी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांचे अभिनंदन देखील करतात.
यावेळी सुद्धा त्यांनी गरीब आणि भुकेने त्रस्त असलेल्या तीन मुलींना मदत केली आहे. पंतप्रधान मोदींकडून भोजन मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
ही घटना भागलपूरच्या खंजरपूरची आहे जिथे घरकाम आणि भांडी साफ करणार्या तीन अनाथ मुलींना उपासमारीने त्रास होत होता .
शेजाऱ्यांनी सुद्धा त्यांना अन्न द्याला नकार दिला असता भुकेलेल्या या तीन उपाशी मुलींनी काेविड-19 साठी देण्यात आलेल्या केंद्राच्या हेल्प डेस्कला याबाबत माहिती दिली.
केंद्र सरकारने हे गांभीर्याने घेतले आणि एका तासाच्या आत जेवण मुलींच्या घरी पोहचवले. जेवण पाहून मुलींच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या.
या जिल्ह्यातील 18 वर्षीय गौरी आणि तिची दोन लहान बहिणी आशा आणि कुमकुम दोघेही तीन दिवसापासून उपाशी होत्या.
गुरुवारी वृत्तपत्रात छापलेल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या 1800118797 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून या तिघांनी माहिती दिली.
दोन दिवसांपासून उपाशी असल्याचे मुलींनी सांगितले. घरात धान्यही नसते ज्यांची घरे भांडी साफ केली होती त्यांनी काम देण्यास आता नकार दिला आहे.
मोठी बहिण गौरी हिने सांगितले की तिचे वडील सिनोद भगत आणि आई अनिता देवी यांचे फार पूर्वी निधन झाले आहे. दोघेही कपडे धुवायचे आणि कुठल्या तरी मार्गाने कुटुंबे चालवत असत.
आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांचा अभ्यासदेखील चुकला. त्यानंतर गौरी शेजार्यांची भांडी साफ करयाची आणि लहान बहिणीनिची देखबाल करत असे. कधीकधी लहान बहीण देखील यात तिला मदत करतात.
तिने सांगितले की लोकांनी लॉकडाऊननंतर एक-दोन दिवस मदत केली. त्यानंतर मदत करणे बंद केले. मग एके दिवशी तिला अचानक वर्तमानपत्रात हा नंबर दिसला आणि तिने यावर फोन केला .
आणि स्वत: बद्दल सांगितले. तिने सांगितले की मला यावर विश्वास बसत नाहीये परंतु थोड्या वेळातच आमच्यासाठी अन्नपदार्थही आले.
जगदीशपूर विभागीय अधिकारी सोनू भगत यांनी सांगितले की पीएमओच्या हेल्पलाइन क्रमांक वृत्तपत्रात पाहिल्यानंतर तिन्ही बहिणींनी पीएमओच्या जिल्हा प्रशासनाला दिलेल्या सूचनेनंतर अर्धा तासात भोजन तयार करुन तिन्ही बहिणींना उपलब्ध करुन देण्यात आले.
यासोबतच मुलींना खाण्यासाठी रेशनही देण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की कोणतीही गरज भासली तर मी त्यांना माझा मोबाईल नंबरही दिला आहे जेणेकरून त्या संपर्क साधू शकतील.
कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूरण देशात लॉकडाऊनची घोषणा केली.
जागतिक संकटाचा धोका लक्षात घेत मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचा सामान्य आणि मोल मजूरी करणाऱ्या कामगारांच्या अडचणी वाढल्या आहेत. लॉकडाऊनच्या निर्णयामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
केंद्र सरकारने अशा लोकांना मदत करण्याची ग्वाही दिली असून अधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.