बॉलिवूडमध्ये अनेकदा नवीन चेहरे पाहायला मिळतात. बर्याचदा मुली नायिका होण्याच्या स्वप्नांसह चित्रपटसृष्टीत प्रवेश करत असतात. परंतु चित्रपट केल्यावर यशस्वी न झाल्यामुळे ते परत आपल्या घरी जातात किंवा लग्न करून स्वताचे घर बसवतात. चित्रपटाच्या जगात अभिनेत्रींचे करिअर कायमच खूप छोटे मानले जाते.
बऱ्याच मोजक्या अभिनेत्री आहेत ज्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप काळ काम करता आलं आहे. अशा काही अभिनेत्री देखील आहेत ज्यांनी बॉलिवूडमधून एक किंवा दोन चित्रपटांमध्ये काम करून यशस्वी न झाल्यामुळे लगेच फिल्म इंडस्ट्रीतून निवृत्ती घेतली. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा पाच अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या खूप सुंदर असूनही त्यांना चित्रपटसृष्टीत यश मिळू शकले नाही.
टिस्का चोप्रा:- यामध्ये पाहिलं नाव येते अभिनेत्री टिस्का चोप्राचे, सौंदर्याच्या बाबतीत सांगायचे तर टिस्का मोठ मोठ्या नायिकांशी स्पर्धा करते. तिची फिल्मी करिअर अगदी सामान्य होती. टिस्का बॉलिवूडमध्ये बर्याच दिवसांपासून काम करत आहे पण आमिर खानचा सुपरहिट फिल्म तारे जमीं पर केल्याने तिला एक नवीन ओळख मिळाली. तारे जमीन पर चित्रपटात टिस्काने बाल कलाकार ईशान अवस्थीची आई साकारली होती. टिस्काने प्लॅटफॉर्म या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
हुमा कुरेशी:- या यादीतील दुसरे नाव आहे अभिनेत्री हुमा कुरेशचे. हुमा इतकी सुंदर आहे की सर्व लोक तिच्या सौंदर्यासाठी वेडे आहेत. आम्ही सांगू की हुमा कुरेशीला अनुराग कश्यपच्या सुपरहिट फिल्म गँग्स ऑफ वासेपुर नंतर बॉलिवूडमध्ये इंट्री मिळाली होती. यानंतर हुमाने बर्याच चित्रपटांमध्ये आणि खासगी अल्बममध्ये काम केले पण हुमा कुरेशीला आजपर्यंत स्टारडम मिळू शकला नाही. आजही हुमा कुरेशी यशस्वी होण्यासाठी धडपडत आहे.
निमृत कौर:- निमृत कौरचे सौंदर्य आजही शाबूत आहे. बॉलिवूडचा एक खिलाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारच्या एरलिफ्ट या चित्रपटात निमृतने मुख्य भूमिका साकारली होती. निमृतने फारच कमी चित्रपटांमध्ये काम केले आहे. म्हणून फ्लॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये निमृताचा देखील समावेश आहे.
रिचा चड्डा:- बॉलिवूडची भोली पंजाबन रिचा चित्रपटसृष्टीत नायिका बनण्यासाठी आली होती. पण तिला नेहमीच चित्रपटांमध्ये बाजूच्या भूमिका मिळाल्या. तसेच फुकरे हा चित्रपट हिट झाल्यानंतर रिचा काही दिवस चर्चेत होती. पण अभिनेत्री म्हणून तिची कारकीर्द अजून काही झाली नाही.
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा सोशल मीडियावर प्रचंड एक्टीव असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी रिचा तिच्या पहिल्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रिचाने तिच्या करिअरमधील पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
माही गिल :- शेवटी आम्ही तुम्हाला अभिनेत्री माही गिल बद्दल सांगत आहोत. माही गिल बॉलिवूडच्या मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसली आहे. देव डी या चित्रपटा नंतर माही गिलची ओळख होती. माही गिल खूप सुंदर आहे पण इतकी सुंदर असूनही माहीची फिल्मी करिअर काही खास राहिली नाही. चित्रपटांमध्ये यश न मिळाल्यामुळे माही लवकरच बॉलिवूडमधून बाहेर पडली आणि चित्रपटांपासून दूर गेली.
देव डी साहेब बीबी और गॅंगस्टार आणि पान सिंह तोमर या चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे माही गिल. माही गिलने आता पर्यंत अनेक बोल्ड भूमिका साकारल्यामुळे आज तिच्याकडे एक बोल्ड अभिनेत्री म्हणून पाहिले जाते. परंतु नेहमी बोल्ड भूमिका साकारणे कंटाळवाणे असते असा खुलासा माहीने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.