करोनाविरुद्धच्या लढाईत अभिनेता अक्षय कुमार मदतीसाठी पुढं येत आहे. पण सध्या तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. जागतिक मासिक पाळी आरोग्य दिनानिमित्त अक्षनं एक ट्विट केलं. हे ट्विट करताना अक्षयनं एक चूक केली. त्यामुळं त्याची पत्नी ट्विंकल हिनं त्याला ट्विटरवरच ट्रोल केलं आहे.
अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ही जोडी बॉलीवूडच्या काही खास जोड्यांपैकी एक आहे. अक्षयचा मजेशीर स्वभाव तर सगळ्यांनाच माहित आहे. त्याने ट्विंकलच्या आईसोबतही अनेकदा प्रँक केले आहेत.
ट्विंकल आणि अक्षय एकमेकांसोबत मजा मस्करी करताना अनेकदा पाहायला मिळतात. २०१८ मध्ये अक्षय कुमारचा पॅडमॅन हा सिनेमा रिलीज झाला होता आणि त्याच्या या सिनेमाचं कौतुकंही झालं होतं.
हा सिनेमा ख-या घटनेवर आधारित आहे. अरुणाचलम मरुगननाथम या व्यक्तीने सॅनिटरी पॅड बनवण्यासाठी जगातील सर्वात स्वस्त मशीन तयार केली होती आणि महिलांना याचा वापर करण्यासाठी जागरुक केलं होतं. या विषयावर हा सिनेमा आहे. नुकतंच पॅडमॅन या सिनेमाला दोन वर्ष पूर्ण झाली.
अक्षयच्या ट्विटने गोंधळ सुरू झाला:- पॅडमॅन या सिनेमाने दोन वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने अक्षय कुमारने ट्वीट केलं आहे. त्याने लिहिलंय पॅडमॅन या सिनेमाला २ वर्ष पूर्ण झाली. मला आनंद आहे की आम्ही एक असा मुद्दा सांगण्यात यशस्वी झालो ज्यावर लोक बोलायला घाबरायचे. मला आशा आहे की आपण देशातील गरिबी नष्ट करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकू आणि मासिक पाळी वर्ज्यचा मुद्दा खोडून काढू शकू.
यावरून चढला पत्नीचा पारा:-अक्षयने या ट्वीटमध्ये सिनेमातील अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटेला टॅग केलंय. अक्षयच्या या पोस्टवर ट्विंकल खन्नाने उत्तर देत लिहिलंय अक्षय कुमार आता तु नक्कीच माझ्या आगामी प्रोडक्शनचा भाग नसशील.
या चित्रपटाच्या निर्मात्याही होत्या आणि चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही मोठी भूमिका होती. चित्रपटाच्या दरम्यान ट्विंकल यांनी मासिक पाळीच्या विषयावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते आणि या विषयावर लोकांशी बोलून महिलांना समजवण्याचे आवाहन केले.
अक्षयला चूक कळली:- यानंतर लगेचच अक्षयने ट्विंकलची माफी मागितली आणि लिहिलं कृपया माझ्या पोटावर लाथ मारु नको. टीमला टॅग करायला विसरलो. मी माझ्या निर्मात्यांची माफी मागतो. सिनेमाचे दिग्दर्शक आर.बल्की ज्यांच्यामुळे हा सिनेमा शक्य नव्हता. खरंतर ट्विंकल खन्ना पॅडमॅन या सिनेमाची निर्माती होती.
अक्षय कुमार नुकताच गरजु महिलांना सॅनिटर पॅड देण्याच्या मोहिमेत जोडला गेला आहे. या मोहिमेत त्याने लोकांना देखील पुढे येऊन मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
एक छोटीशी चूक आपल्याला इतकी महागात पडेल, याचा विचारही अक्षय कुमारने केला नव्हता. त्यातही चूक अशीही थेट पोटावर लाथ पडायची. पण अक्षयच्या हाताने ही चूक झाली आणि मग काय या चुकीसाठी त्याला पत्नी ट्विंकल खन्नाची ट्विटरवरून जाहीरपणे माफी मागावी लागली.
ट्विंकल आणि अक्षय बी टाऊनच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. ट्विंकलने काही वर्षांपूर्वी अभिनय सोडल्यानंतर लेखनास सुरूवात केली आहे तर त्यानंतर तिने चित्रपट निर्मिती करण्याचाही निर्णय घेतला होता.