बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने खूप कमी वेळामध्ये नाव कमवून यश मिळवले आहे. सारा अली खान स्वताच्या मेहनतीसाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते.
तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधल्या सर्व चित्रपटांमधले तिचे काम पाहून प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले आणि सर्वांना ती खूप आवडते. सारा अली खान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह राहत असते आणि ती आपले नवनवीन फोटोज आणि व्हिडिओज अपलोड करून आपल्या चाहत्यांना खुश करत असते.
तर आज आम्ही तुम्हाला सारा अली खानने एका शो दरम्यान केलेल्या एका धक्कादायक खुलासा बद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये सारा तिच्या वडिलांना म्हणजेच सैफ अली खान यांना सांगताना दिसली की तिला रणबीर कपूरसोबत लग्न करायचे आहे आणि कार्तिक आर्यनसोबत डेटवर जायचे आहे.
सारा अली खान केदारनाथ चित्रपटाच्या प्रमोशनासाठी वडील सैफ अली खानसमवेत कॉफी विथ करण शोमध्ये गेले होते. साराने शोमध्ये तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी सं*बंधित काही रहस्येही शेअर केली. शोमध्ये करण जोहरने सारा अली खानला एक वैयक्तिक प्रश्न विचारला होता ज्यात साराने मोठ्या धाडसाने आपले वडील सैफ अली खानसमोर त्याचे उत्तर दिले.
सारा अली खान रणबीर कपूरशी लग्न करू इच्छित आहे: – सारा म्हणाली की तिला तिची सावत्र आई म्हणजेच करीनाच्या भाऊ रणबीर कपूरसोबत लग्न करायचे आहे.
तिने पुढे म्हटले आहे की तिला रणबीरला डेट करायचे नसून फक्त लग्न करायचे आहे. यादरम्यान करण जोहरने साराला विचारले की तिला कोणाबरोबर डेटवर जायचे आहे तेव्हा तिने उत्तरात सांगितले की तिला कार्तिक आर्यनसोबत डेटवर जायचे आहे.
यादरम्यान करण जोहरने सैफ अली खानला साराच्या बॉयफ्रेंडला काय प्रश्न विचारतील अशी विचारणा केली मग तो म्हणाला की मी त्याच्या राजनीती विचरांबद्दल आणि मादक पदार्थांबद्दल प्रश्न विचारेल.
पण सारा तिच्या आवडीच्या मुलाबरोबर लग्न करत असेल तर आमचा विरोध नाही. सैफ पुढे म्हणाला की ज्या मुलासोबत माझ्या मुलीला लग्न करायचे आहे त्याच्याकडे मात्र भरपूर पैसे असलेच पाहिजेत.
साराच्या या इच्छेबाबत कार्तिक काय प्रतिक्रिया देतो याची उत्सुकता अनेकांना होती. काही कार्यक्रमांमध्ये त्याला हा प्रश्नसुद्धा विचारण्यात आला होता. कार्तिकने नुकतेच त्याचं उत्तर दिलं आहे आणि ते ऐकून सारा नक्कीच खूश होईल.
प्यार का पंचनामा सोनू के टिटू की स्वीटी यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला कार्तिक आर्यन सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कार्तिकचाही मोठा चाहतावर्ग आहे. साराने थेट एका चॅट शोमध्ये त्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याला उत्तर देणं भाग होतं.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला साराने तिचा पत्ता पाठवावा मी वाट पाहतोय. सारा आणि मी पार्ट्यांमध्ये भेटलो आहोत आणि तेव्हा फक्त हॅलो-हाय इतकंच बोलणं झालं होते असंही तो म्हणाला.
सारा आणि कार्तिकची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा लव्ह आज कल हा चित्रपट फेब्रुवारी मध्ये रिलीज झाला होता.
हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या लव्ह आज कल चा सिक्वेल आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी चित्रपटाच्यात नावत बदल न करता साधारण सारख्याच आशयाची कथा या सिक्वेलमध्ये मांडली आहे.