9 तासची विचारपूस केल्याच्या नंतर सुशांत सोबत आपल्या नातेबंधांबद्दल आणि चित्रपटसृष्टीला धरून गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने केले अनेक खुलासे …

Bollywood

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत च्या आत्मह त्येमुळे बॉलिवूडपासून पूर्ण देश हा-दरला आहे. सुशांत यांच्या नि धनाने चित्रपटातील कलाकारांना धक्का बसला आहे.  आत्मह त्येचे गूढ सोडविण्यासाठी सुशांतच्या जवळच्या मित्रांकडे मुंबई पोलिस विचारपूस करत आहेत. या भागातील वांद्रे पोलिसांनी गुरुवारी सुशांतची जवळची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची चौकशी केली. चौकशी दरम्यान रियाने सुशांतच्या आत्मह त्येशी सं-बंधित अनेक रहस्ये उघडकीस आणली आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार सुशांतने मृ त्यू होण्यापूर्वी रियाला फोन केला होता आणि सध्याच्या काळात रिया-सुशांत एकमेकांना डेट करत होते. तर यासाठी पोलिस रियाची विचारपूस करत आहेत. सकाळी 11 वाजता रिया पोलिस स्टेशन ला आली आणि सुमारे 9 ते 10 तासानंतर बाहेर पडली. चला तर मग रियाने सुशांत बद्दल काय काय खुलासे केले ते जाणून घेवूया.

रियाचे  सुशांतशी भांडण झाले होते:- पोलिसांच्या चौकशी दरम्यान रिया चक्रवर्तीला सुशांतशी सं-बंधित अनेक प्रश्न विचारले गेले. सुशांतशी तिचे वैयक्तिक सं-बंध कसे होते विवाहाच्या मुद्द्यांपासून त्याच्या इतर मैत्रिणींशी असलेले सं-बंध नैराश्य आणि सुशांत सिंग यांचे इंडस्ट्रीशी असलेले सं-बंध. पिंकविलाच्या अहवालात रियाच्या वक्तव्याचा खुलासा करण्यात आला असून असे म्हटले आहे की ती आणि सुशांत खार येथील कार्टर रोड येथील पेंट हाऊसमध्ये एकत्र राहत होते.

सुशांतने त्याचा मित्र सिद्धार्थ पितानी याच्यासह हा बंगला भाड्याने घेतला होता. मात्र सुशांतच्या मृ त्यूच्या काही दिवस आधी रियाने हे घर सोडले होते. या अहवालानुसार रियानेही कबूल केले आहे की सुशांतच्या मृ त्यूच्या काही दिवस आधी दोघांचे भांडण झाले होते तरी सुद्धा दोघांचे मेसेजेस आणि फोनवर संभाषण होत होते.

या भांडणा नंतर एकमेकांना पाठविलेले मेसेजेस देखील रियाने पोलिसांना दाखवले आहेत आणि हेही सांगितले की या दोघांमधील भांडणानंतरही त्यांचे फोन कॉल्सद्वारे संभाषण सुरु होते.

सप्टेंबर 2019 पासून सुशांत नै-राश्यात होता:- रिया चक्रवर्ती हिने पोलिसांना असे सांगितले की ते दोघे लवकरच घर घेणार होते आणि सन 2020 अखेर ते दोघे लग्नही करणार होते. रियाने पोलिसांना सांगितले की सप्टेंबर 2019 मध्ये दिल गरीब फिल्म पूर्ण झाल्यानंतर सुशांतला नै राश्याची चिन्हे दिसू लागली. सुरुवातीला सुशांत त्या कडे दुर्लक्ष करत होता परंतु हळू हळू त्रास सुरू झाला .

रियाच्या म्हणण्यानुसार तिने स्वत: सुशांतला एका डॉक्टरांकडे नेले आणि सुशांतचा उपचार सुरू केला. रियाच्या म्हणण्यानुसार  सुशांत योग्य प्रकारे औषधे घेत नव्हता. कधी सुशांत शांत बसयचा तर कधी अचानक त्याचा मूड मध्ये बदल यायचा. रिया म्हणते की जोपर्यंत ती सुशांतबरोबर होती तोपर्यंत ती त्याची चांगली काळजी घेत होती पण सुशांतने स्वत: एकटे राहण्याविषयी बोलून तिला घरी पाठवले.

सुशांतने रियाला यशराज फिल्म सोडण्यास  सांगितले:- रियाने पोलिस चौकशी दरम्यान सांगितले की सुशांतने सुमारे एक वर्षापूर्वी काहीच सं-बंध नसताना यशराज  फिल्म सोडण्यास सांगितले होते. जेव्हा मी सुशांतला तो असे का करीत आहे याबद्दल विचारले तेव्हा तो काही बोलला नाही फक्त यशराजला फिल्म तू सोड यावरच तो दबाव देत होता. पण रियाने असे काही केले नाही कारण तिला असा यशराज बद्दल कोणताही वाईट अनुभव नव्हता.

रुमी जाफरी चा चित्रपट करण्यास सुशांत खूप एक्साइडेट होता:- रियाने सांगितले की हे दोघेही रूमी जाफरी यांच्या दिग्दर्शनाखाली एक चित्रपट करणार होते. ज्याची निर्मिती वासु भगनानी करणार होते. या  चित्रपटाचे  फेब्रुवारीमध्ये  शु टींग सुरु होणार होते.

त्यानंतर शू टिंग मे महिन्यात सुरू करायचे ठरले होते पण लॉकडाऊनमुळे ते होऊ शकले नाही. सुशांत त्याच्या भावी प्रोजेक्ट्स बद्दल देखील खूप उत्सुक होता आणि त्यावर काम करत होता. रियासुद्धा त्याच्या प्रोजेक्टमध्ये त्याला साथ देत होती.

सुशांत सिंहने मा नसिक तणावाखाली आत्मह त्या केल्याची चर्चा असून बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रेटींना यासाठी जबाबदार धरलं जात आहे.  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तशी माहिती दिली आहे. रिया चक्रवर्तीकडे यासं-बंधी अधिक माहिती असल्याची शक्यता असल्याने पोलीस तिची कसून चौकशी करत असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *