बोनी कपूरचे पहिले लग्न मोना शौरीशी झाले होते. पण मोनाचा 2012 मध्ये मृत्यू झाला. मोनाबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. परंतु कदाचित आपल्याला हे माहित नाही असेल की मोना एक यशस्वी बिजनेस वूमेन आणि निर्माती होती.
मोना मुंबईच्या सर्वात मोठ्या रेडी-टू-शूट-स्टुडिओची सीईओ देखील होती. मोनाचे 1983 मध्ये बोनी कपूरसोबत लग्न झाले होते. 1985 मध्ये तिने अर्जुन कपूरला आणि 1987 मध्ये मुलगी अंशुलाला जन्म दिला. पण 1996 मध्ये बोनी कपूरने श्रीदेवीशी लग्न केले तेव्हा मोनाला समजले की त्यांचे घर तुटले आहे.
मोना एकदा 2007 मध्ये तिच्या मुलाखतीत श्रीदेवी आणि बोनी कपूरच्या लग्नाबद्दल बोलली होती. ती म्हणाली होती की- बोनी बरोबर लग्न खूप चांगल्या प्रकारे झाले होते. तो माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता. जेव्हा मी त्याच्याशी लग्न केले तेव्हा मी फक्त 19 वर्षांची होते.
आमचे लग्न 13 वर्षांचे होते. पण जेव्हा मला हे कळले की माझे पती दुसर्यावर प्रेम करतात तेव्हा मला धक्का बसला. मोना कपूर असेही म्हणाली होती की बोनीला आता माझ्याशिवाय इतर कोणाची सुद्धा गरज आहे. या नात्याला दुसरी संधी देण्यास काहीही शिल्लक राहिले नव्हते कारण श्रीदेवी ग र्भवती झाली आहे.
त्यांचे सं-बंध प्रस्थापित केले गेले होते . तर मी बाहेर पडणे हेच चांगले होते. बोनी कपूर यांची पहिली पत्नी आणि अभिनेता अर्जून कपूरची आई मोना शौरी-कपूर यांचा वयाच्या ४८व्या वर्षी मृत्यू झाला.
याला नियतीचा खेळ म्हणता येईल किंवा दुर्दैवी योगायोग कारण मोना आणि श्रीदेवी या दोघांच्या मृ-त्यूसंदर्भात एक विचित्र साम्य आढळून आले आहे. ज्याप्रमाणे मोना यांचे आपल्या मुलाचा म्हणजेच अर्जूनचा पहिला सिनेमा पाहण्याआधीच नि धन झाले त्याचप्रमाणे जान्हवीचा पहिला सिनेमा पाहण्याआधीच श्रीदेवी यांचेही आकस्मात नि धन झाले.
अर्जून कपूरचा इश्कजादे हा पहिला सिनेमा २०१२ साली मे महिन्यात प्रदर्शित झाला. मात्र त्याआआधीच म्हणजे २५ मार्च २०१२ रोजी मोना यांचे नि धन झाले. श्रीदेवी यांच्याबद्दलही असेच काहीसे घडले. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीचा धडक हा सिनेमा प्रदर्शित होणार होता.
मात्र त्याआधीच श्रीदेवी यांचे नि धन अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. त्या बातमीवर चाहत्यांच्या आजही विश्वास बसत नाहीये. मुख्य म्हणजे त्या असंख्य चाहत्यांमध्ये श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांच्याही नावाचा समावेश आहे.
आयुष्यात अशा जवळच्या व्यक्तींचं निघून जाणं खरंतर बऱ्याच प्रमाणात एखाद्याला पुरतं बदलून टाकतं. पण, बोनी मात्र या परिस्थितीतही ठामपणे उभे राहिले. एका मुलाखतीत ते म्हणाले की कोणताही आ घात सहन करण्याची माझी ताकद तुलनेने जास्त चांगली आहे.
मग ते शारीरिकदृष्ट्या असो किंवा भावनिकरित्या. मी खोटं नाही सांगत पण वेळप्रसंगी मीसुद्धा पूर्णपणे तुटतो परिस्थितीपुढे हतबल होतो . पण नंतर पुढचे निर्णय घेण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा स्वत:ला सावरतो.
सध्याच्या घडीला आपल्यापुढे कोणतंही संकट आलं तर त्यासाठी आपण तयार असल्याचंही ते म्हणाले. आता कोणत्याही संकटासाठी मी तयार आहे. मुळात मला कशाचीही भीती वाटत नाही. आयुष्यात येणाऱ्या नकारात्मक आणि अनपेक्षित वळणांसाठी मी पूर्णपणे तयार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.