लग्नाच्या दीड वर्षानंतर अनुष्काने केला खुलासा – कमी वयातच केले लग्न करण कोहली..

Bollywood

बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपे आहेत ज्यांना लोक खूप पसंत करतात आणि त्यांचे चाहते नेहमीच त्यांची एक झलक पाहायची वाट बघत असतात यामध्ये अशी एक जोडी म्हणजे विराट आणि अनुष्काची जोडी ज्यांची चर्चा सर्वत्र असते.

असं म्हणतात की विराट आणि अनुष्काचे वर्ष २०१७ मध्ये ११ डिसेंबर रोजी लग्न झाले होते आणि यानंतर कदाचित सर्वांनाच आश्चर्य वाटले होते लोकांचा यावर विश्वास बसत नव्हता. जेव्हा त्यांचे लग्नाचे फोटोज सर्वत्र पसरले तेव्हा लोकांना खात्री झाली.

बॉलिवूड मध्ये टॉप असणाऱ्या अभिनेत्र्यांमधून एक असणाऱ्या अनुष्का शर्मा ने लग्नाच्या दिढ वर्ष्यानंतर एक असं गुपित उघड केलं आहे ज्याविषयी प्रत्येक जण जाणून घेऊ इच्छितो. अनुष्का शर्मा ने २०१७ मधील डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट सोबत लग्न केलं.

लग्नानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते तसेच यांच्या लग्नानंतर अनेक मोठ्या अभिनेत्यांनी देखील २०१८ मध्ये लग्न केले.

अनुष्काने विराट सोबत लग्न करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला जेव्हा ती करिअरची मोठी सुरुवात करत होती. आता तिने मोठं गुपित उघड केलं आहे.

अनुष्का शर्मा आज बॉलिवूड मधली एक हिट अभिनेत्री म्हणून गणली जाते आणि तीचे सौंदर्य आणि दमदार अभिनयामुळे सर्व दिग्दर्शक आणि निर्मात्यांची ती पहिली पसंती बनली आहे.

पण जेव्हा अनुष्काला विचारण्यात आले की तिने इतक्या  लवकर लग्न करण्याचे का ठरविले. तेव्हा तिने सांगितले की आमच्या इंडस्ट्रीपेक्षा आमचे प्रेक्षकांचा जास्त विकास झाला आहे. आता प्रेक्षक फक्त कलाकारला पडद्यावर पाहण्यात रस घेतात. त्यांना त्या कलाकाराच्या वैयक्तिक जीवनाची पर्वा नसते.

पुढे अनुष्का म्हणाली कलाकार विवाहित आहे की ती आई बनली आहे याची आता प्रेक्षक पर्वा करीत नाहीत. आपण या पूर्वाग्रहातून बाहेर पडणे आवश्यक आहे. माझे लग्न वयाच्या 29 व्या वर्षी झाले जे एका अभिनेत्रीपेक्षा कमी आहे.

मी प्रेमात पडले म्हणून मी लग्न केले आणि मी त्याच्यावर प्रेम केले. विवाह ही एक गोष्ट आहे जी नात्याला पुढे घेवून जाते. मी नेहमीच या बाजूने उभी राहिले आहे की स्त्रियांना समान वागणूक दिली पाहिजे.

पुढे बोलताना अनुष्का म्हणाली त्याचा प्रामाणिकपणा हीच एक गोष्ट आहे ज्याचे मला खूप कौतुक वाटते. मी एक प्रामाणिक मुलगी आहे म्हणून मला या गोष्टींबद्दल खूप माहिती आहे.

मी त्याच्यासारख्या व्यक्तीला भेटले याबद्दल मला खूप आनंद झाला आहे कारण आम्ही दोघेही संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे जगतो. माझा एक लाइफ पार्टनर आहे ज्याच्यात काहीच खोटे नाही सर्व काही त्याच्यामध्ये खरे आहे.

ती म्हणाले माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगताना मला मनातून घाबरायचं नाहीये. जर एखादा माणूस लग्न करण्यास आणि काम करण्यास घाबरत नसेल तर स्त्रियांच्या बाबतीत असे का होऊ नये.

आपल्या सर्वांना माहितच आहे की या काळात कोरोना विषाणूमुळे देश पूर्णपणे बंद झाला आहे आणि यादरम्यान स्टार्ससुद्धा आपल्या कुटूंबासमवेत घरीच आहेत.

यावेळी अनुष्का आणि विराट देखील एकमेकांसोबत बराच वेळ घालवत आहेत. ते एकमेकांचे सुंदर फोटोज देखील शेअर करत आहेत जे त्यांच्या चाहत्यांकडून खूपच पसंत केले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *