बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक अभिनेत्या होऊन गेल्या. प्रत्येक दशकात अशी एक अभिनेत्री होत्या त्यांनी अक्षरशः रुपेरी पडदा गाजवला आहे. प्रत्येक दशकांत सिनेमा जसा बदलत जातो तसेच त्यातील अभिनेत्रींची कामंही बदलत जातात. पण अशा काही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आहेत ज्यांनी वडिलांसोबत हिट सिनेमे तर केलेच शिवाय त्यांच्या मुलांसोबतही हिट सिनेमे दिले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच सुपरहिट अभिनेत्रींची नावं सांगणार आहोत.
माधुरी दीक्षित:- आजच्या काळात चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स सामान्य बाब आहे. मात्र ९० च्या दशकात चित्रपटांमध्ये लिप लॉक सीन्स शूट करणे खूपच मोठी बाब समजली जात होती. जर बॉलिवूडमधील बोल्ड चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास त्यामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्या दयावान या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख केला जातो. १९८८ ची ही गोष्ट आहे. जेव्हा माधुरी आणि विनोद यांच्यात अतिशय बोल्ड सीन्स शूट करण्यात आले होते.
बॉलिवूडची माधुरी दीक्षित विनोद खन्नाबरोबर दयावान चित्रपटात रोमांस करताना दिसली होती. दोघांचे हॉट इंटिमेट सीन अजूनही सर्वाना आठवतात. नंतर माधुरीने विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्नासोबत मोहब्बत चित्रपटात रोमान्स केला आहे.
श्रीदेवी:- श्रीदेवी जरी आज आपल्यासोबत नसल्या तरी त्यांच्या अभिनयातून त्या नेहमीच लक्षात राहतील यात काही वाद नाही. बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी धर्मेंद्र आणि सनी देओलची नायिका म्हणून दिसली आहे. श्रीदेवीने धर्मेंद्रबरोबर नायिका म्हणून बरेच काम केले तर श्रीदेवी सनी देओलसोबत चालबाज निगाहे राम अवतार अशा बर्याच चित्रपटांमध्ये सनी बरोबर रोमान्स करताना दिसल्या.
अमृता सिंग:-अमृताने बेताब सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या सिनेमात तिच्यासोबत सनी देओल होता. पण फार कमी लोकांना माहित आहे की या सिनेमानंतर अमृताने धर्मेंद्र यांच्यासोबत सच्चाई की ताकत सिनेमांत काम केले होते.
डिंपल कपाडिया:-डिम्पल यांनीही धर्मेंद्र आणि सनी देओलसोबत काम केले आहे. एवढेच नाही तर डिंपल यांनी विनोद आणि अक्षय खन्नासोबत काम केले आहे. डिंपल यांनी धर्मेंद्रसोबत बंटवारा आणि शहजादे सिनेमात काम केले तर सनीसोबत नरसिम्हा मंजिल मंजिल अर्जुन गुनाह आग का गोला या सिनेमांत काम केले आहे. तसेच विनोद खन्ना आणि डिंपल कपाडियाची जोडी खून का कर्ज आणि इंसाफ सिनेमात एकत्र दिसले होते. तसेच दिल चाहता है सिनेमात डिंपलने अक्षयसोबत काम केले.
हेमा मालिनी:-सपनों का सौदागर सिनेमातून हेमा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी राज कपूरसोबत काम केले होते. राज कपूरने पहिली स्क्रीन टेस्ट घेतली होती. हेमा मालिनीचा असा विश्वास आहे की ती आज जे काही आहे ते राज कपूर यांच्यामुळे आहे. राज कपूरबरोबर काम केल्यानंतर हेमा मालिनी यांना देवानंद सोबत जॉनी मेरा नाम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला.
या सिनेमानंतर त्यांनी राज कपूर यांची मुलं ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांच्यासोबत काम केले. ऋषी यांच्यासोबत एक चादर मैली सी सिनेमात काम केले तर रणधीर कपूरसोबत हाथ की सफाई मध्ये हेमा मालिनी यांनी काम केले होते.