बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी एकेकाळी एकमेकांवर खूप प्रेम केले होते परंतु हे कपल्स कधीच एक होऊ शकले नाहीत बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल्स आहेत जी बॉलिवूड कॉरिडोरमध्ये सर्वाधिक चर्चेत असतात.
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी या जोडीने बर्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे यादरम्यान हे दोघे एकमेकांच्या जवळ आले. बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर याचा शेवट झाला पण आजही चाहत्यांना शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांना मोठ्या स्क्रीनवर एकत्र बघायला आवडत.
शिल्पा शेट्टीच्या ब्रेकअपनंतर अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केले आणि आज ते दोघेही सुखी आयुष्य जगत आहेत तर शिल्पाने कोट्याधीश व्यापारी असलेल्या राज कुंद्राशी लग्न केले आहे. लग्नानंतर शिल्पा शेट्टीने बॉलिवूड इंडस्ट्रीला निरोप दिला पण अजूनही ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये दिसली जात आहे. आपल्या सर्वांना हे माहिती आहे की ती सुपर डान्सर सारख्या प्रसिद्ध शोची जज आहे.
अलीकडेच या शोमध्ये शिल्पा शेट्टी एका सिमरी गाऊनमध्ये दिसली होती ज्यात ती एका परीसारखी दिसत होती. या फोटोजमध्ये शिल्पा शेट्टी कमीतकमी मेकअप करून सुद्धा खूप सुंदर दिसत होती. शिल्पा शेट्टी 43 वर्षांची आहे पण तिला पाहून तिच्या वयाचा अंदाज करणे कठीण आहे ती बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. तिचा फिटनेस खरोखरच अप्रतिम आहे.
राज कुंद्रा सोबत ती कायम बाहेर दिसते आणि ती सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव राहते. नुकतेच मदर डेच्या दिवशी शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात ती आपल्या आई आणि मुलासमवेत दिसली आहे शिल्पा शेट्टी नेहमीच वेग वेगळ्या लूकमध्ये बघयाला मिळते आणि तिचा फोटोशू ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो . तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
बॉलिवूडची फिट गर्ल अर्थात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला फिटनेसचे किती वेड आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. ती कायम तिच्या फिटनेसबाबत जागरूक असते. त्यामुळेच तिच्या जीवनशैलीमध्ये जिम आणि योग यांना महत्वाचे स्थान आहे.
स्वत: फिट राहण्यासोबतच ती इतरांनाही फिट राहण्याचा सल्ला देत असते. यासाठी तिने योगची सीडी किंवा काही पुस्तकांच्या माध्यमातून महिलांना फिटनेसचे काही धडेही दिले आहेत. त्यानंतर आता शिल्पाने योगचे धडे देण्यासाठी तीचे एक खास एप तयार केल्याचं समोर आलं आहे.
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच या दिवशी चाहत्यांना एक खास भेट दिली आहे शिल्पाने एक एप तयार केलं आहे. या एपच्या माध्यमातून ती चाहत्यांना योगचे धडे देणार आहे. शिल्पा शेट्टी योग असं या एपच नाव आहे.
जर नियमितपणे योग व्यायाम केला तर आजारपण ओढावणार नाही, असं शिल्पा सांगते. दरम्यान शिल्पाने आतापर्यंत काही फिटनेस सीडी पुस्तक लॉन्च केले असून चाहत्यांचा त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची आहे. शिल्पा शेट्टी अभिनेत्री असल्याने नेहमी चर्चेत असते. तर राज कुंद्रा प्रसिद्धीपासून नेहमी दूर असतो. पण शिल्पा शेट्टीमुळे त्यांच्या जोडीची सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा सुरु असते.