जेव्हा एकता कपूर सोबत लग्न करायला तयार होते करण जोहर, ठेवली होती हि अट….

Bollywood Entertainment

लॉकडाऊनच्या दरम्यान जिथे बॉलिवूड स्टार्सचे जुने फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत,तिथे सेलिब्रिटींच्या जुन्या मुलाखती सोशल मीडियावर जोरदार पुन्हा व्हायरल  होत आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर यांची जुनी मुलाखतही व्हायरल होत आहे, मीडिया रिपोर्टनुसार करण जोहरने या मुलाखतीत आपल्या लग्नाबद्दल चर्चा केली होती. वास्तविक करण जोहरच्या या मुलाखतीमध्ये त्याने म्हणले होते की मी आणि एकता कपूर चांगला जोडीदार शोधत आहोत. जर आम्हा दोघांना आमच्या मनानुसार जोडीदार सापडला नाही तर आम्ही दोघे एकमेकांशी लग्न करू असे त्याने म्हणले होते.

एकता कपूर आणि करण जोहर ही दोन्ही बॉलिवूडमधील लोकप्रिय नावे आहेत. करणने आजवर अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे तर एकताने छोट्या पडद्यावरील अनेक हिट मालिकांची निर्मिती केली आहे.

ते दोघे ही आज यशस्वी निर्मात्यांच्या यादीमध्ये गणले जातात. तसेच एकता कपूर आणि करण जोहर या दोघांमध्ये चांगले मैत्रीचे नाते देखील आहे. पण काही दिवसांपूर्वी ते दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते.

एकता कपूर आणि करण जोहर ही फिल्म इंडस्ट्रीची मोठी नावे आहेत. कॅमेर्‍याच्या मागे राहूनही दोघांनीही वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकता आणि करण दोघेही खूप चांगले मित्र आहेत. दोघेही लग्न न करता सरोगसीद्वारे पालक झाले आहेत. या दोघांमध्ये बर्‍याच गोष्टी सामान्य आहेत ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. या कारणास्तव एकता कपूर आणि करण जोहरच्या लग्नाच्या बातम्याही चर्चेत आल्या होत्या.

एका मुलाखतीत करण जोहरने आपल्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला होता. करण जोहर म्हणाला की मी आणि एकता योग्य जोडीदार शोधत आहोत. जर आम्हाला योग्य जोडीदार सापडला नाही तर आम्ही एकमेकांशी लग्न करू.

माझ्या आणि एकताच्या लग्नामुळे कोणी खुश होवो किंवा न होवो परंतु माझी आई खूप खुश होईल. जर मी एकताशी लग्न केले तर माझ्या आईला एकताच्या मालिकांमध्ये पुढे काय होणार हे आधीच माहिती होईल असे करण मजेशीर अंदाजात बोलला होता. त्याचे हे उत्तर ऐकून सर्वजनांना हसू आले होते.

आपणास माहिती आहे का की 7 जून रोजी एकता कपूर 45 वर्षांची झाली. एकता कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि ती येथे मोकळेपणाने बोलत असते ज्यामुळे बर्‍याचदा वादही उद्भवतात. पण एकताला काही फरक पडत नाही.

त्याचवेळी करण जोहर आजकाल सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक सेल्फी शेअर केला आहे ज्यामध्ये त्याचे केस पांढरे दिसत आहेत.

या पोस्टवर कमेंट करताना एकताने त्याला आपल्या सुपरहिट शो कसौटी जिंदगीमध्ये श्री. बजाजच्या भूमिकेची ऑफर दिली आहे. माझी एक टीव्ही सीरिअल सुरु आहे. त्यातील मिस्टर ऋषभ बाजाज या पात्राचे केस पांढरे आहेत. आम्ही मालिकेतील चेहरे बदलतच असतो. तुला हवं तर तु प्लीज टीव्ही सीरिअलमध्ये ये असे तिने कमेंटमध्ये म्हटले आहे.

हे दोघेही बॉलिवूडचे अत्यंत टैलेंटेड प्रोड्यूसर आहेत. दोघेही स्टार किड्स असून करण जोहर आणि एकता कपूर यांनी सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले आहेत. लॉकडाउनच्या दिवसात करण जोहर आणि एकता कपूर हे दोघेही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात.

करण जोहर आपल्या दोन्ही मुले रुही आणि यशसोबत इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे जो जोरदार व्हायरल होत आहे. एकता कपूरसुद्धा आपल्या मुलासमवेत पूर्ण वेळ घालवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *