बॉलीवुडच्या ह्या फेमस जोड्यांनी सिद्ध केलं कि प्रेम हे वय बघून होत नसत …

Bollywood

तुम्ही प्यार किया तो डरना क्या प्यार दीवाना होता है प्यार ही ज़िन्दगी है असे वाक्यप्रचार तुम्ही नेहमीच ऐकत आले आसल. जेव्हा आपले एखाद्यावर प्रेम असते तेव्हा ना आपण जात बघतो ना ध र्म. आणि बॉलिवूडनेही हे सिद्ध केले आहे. बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना असे वाटते की प्रेम खरोखरच आंधळे आणि वेडे आहे. बॉलिवूडमधील बर्‍याच अभिनेत्रींनी आपल्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या अभिनेत्याशी लग्न केले आहे. ज्यांना लग्नाआधीपासूनच मुले होती.

या जोडप्यांमधील वयातील फरक आपल्याला आश्चर्यचकित करेल परंतु ही जोडपी अजूनही सुखी आयुष्य जगत आहेत आणि अनेक लोकांसाठी ते आदर्श ठरत आहेत. आपण आज अशाच काही बॉलिवूडच्या जोडप्यांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या जोडीदाराचे वय विचारात न घेता त्यांच्याशी लग्न केले आहे.

१. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा:- यशराज बॅनरचे सर्वे सर्वा आदित्य चोप्रा यांनी राणी मुखर्जीसोबत दुसरे लग्न केले आहे. पहिल्या पत्नीला घटस्फो-ट दिल्यानंतर त्यांनी राणी मुखर्जी यांच्यासोबत लग्न केले.

या दोघांनी 2014 ला इटलीमध्ये जाऊन लग्न केले होते. राणी मुखर्जी यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की त्या आयुष्यात फक्त एका माणसाच्या प्रेमात पडल्या आणि आज तो व्यक्ती तिचा जोडीदार आहे. लग्नाआधी राणी मुखर्जी यांनी यश राज बॅनरच्या अनेक चित्रपटात काम केले होते. या दोघांना आज आदिरा नावाची एक गोड मुलगी आहे.

२. फराह खान आणि शिरीष कुंदर:- मैं हूं ना, हॅपी न्यू इयर आणि ओम शांती ओम यासारख्या चित्रपटाची दिग्दर्शक असलेली आणि कोरिओग्राफर फराह खान यांची प्रेम कहाणी सुद्धा बरेच दिवस चर्चेत राहिली होती. यामागचे कारण असे की त्यांचे पति हे त्यांच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहेत. कदाचित आपल्याला माहित नसेल पण फराह यांचे पती शिरीष कुंदर हे देखील बॉलिवूड दिग्दर्शक आहेत. त्यांनी जोकर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. फराह खान यांना आज तीन मुले आहेत. हे जोडपे आजही अगदी आनंदाने त्यांचे विवाहित जीवन जगत आहेत.

३. श्री देवी आणि बोनी कपूर:- दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची जोडी बॉलिवूडमध्ये बर्‍याच काळ चर्चेचा विषय ठरली होती. याचे कारण म्हणजे बोनी कपूर हे श्रीदेवी यांच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते शिवाय बोनी कपूर यांचे आधीच लग्न झाले होते.

बोनी आणि श्रीदेवीचे प्रेम बर्‍याच वळणातून गेले आहे. सुरुवातीला हे एकतर्फी प्रेम होते आणि त्याची सुरुवात मिस्टर इंडिया चित्रपटाच्या सेटपासून झाली होती पण बोनी कपूर यांना श्रीदेवी तेव्हा पासूनच आवडत होत्या जेव्हा श्रीदेवी यांनी तमिळ चित्रपटांमध्ये काम करायला चालू केले होते. बोनीही त्यांना भेटण्यासाठी अगदी आनंदाने चेन्नईला जात असत.

श्री देवीचे लग्न झाले तेव्हा त्या आधीच ग-रोदर होत्या. तसेच या दोघांना दोन मुली सुद्धा आहेत. एकीचे नाव जान्हवी कपूर तर दुसरीचे नाव खुशी कपूर असे आहे. तसेच जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे आणि आपल्या आईच्या पावलांवर पाऊल टाकत चालत आहे. श्रीदेवी या बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक होत्या. पण दुर्दैवाने 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी हे जग सोडून निघून गेल्या.

४. जूही चावला आणि जय मेहता:- ड र कयामत से कयामत तक बोल राधा बोल अशा चित्रपटांमुळे कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करणारी जूही चावला तिच्यापेक्षा खूप मोठ्या व्यक्तीशी विवाहबद्ध झाली आहे. तिच्या पतिचे नाव जय मेहता असे आहे.

जय मेहता हे आधीपासूनच विवाहित होते. एका विमान  अ पघा तात त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृ त्यू झाला होता. असे म्हटले जाते की जय मेहता हे जूही पेक्षा फक्त पाच ते सहा वर्षांनी मोठे आहेत परंतु त्यांना पाहिल्यावर ते खूपच वयस्कर असल्याचे दिसतात. 2012 मध्ये या दोघांनी एकमेकांशी लग्न केले होते. हे दोघे अजूनही त्याच आनंदाने त्यांचे विवाहित जीवन जगत आहेत.

५. संजय दत्त आणि मान्यता दत्त:- संजय दत्त यांचा चित्रपटांबद्दल जेवढी चर्चा होत नाही त्याच्यापेक्षा जास्त चर्चा ही त्यांच्या आयुष्यात होणाऱ्या घटनांची होत असते. बॉलिवूडमधील ख लनायक म्हणून ओळखल्या जाणार्‍या संजय दत्त याचे तीन विवाह झाले आहेत. सध्या त्यांची पत्नी म्हणजेच मान्यता दत्त या संजय दत्त याचा पेक्षा किमान 20 वर्षांनी लहान आहे. अगदी प्रतिकूल परिस्थितीतही हे जोडपे एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे आपण बघितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *