राशन खरेदी करायला घरातून बाहेर निघाली हिना खान, म्हणाली भाज्यांना कसे करणार सैनिटाइज

Bollywood

लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश घरात बंदिस्त आहे तर कोरोना संसर्गाची भीती वाढतच चालली आहे. टीव्ही अभिनेत्री हिना खानसुद्धा एकटी घर स्वच्छ करत आहे.

दरम्यान हिनाने सांगितले आहे की ती घराबाहेर जावून तिने भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या  आहेत. हिनाने एक व्हिडीओ पोस्ट करुन भाजीपाला स्वच्छ कसा करावा याची माहिती दिली आहे.

हिनाने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सांगितले की ती रेशन खरेदी करण्यासाठी घराबाहेर आली होती. तिने तिच्या चाहत्यांना बाहेरून आणलेला माल स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. हिनानेही स्वत: हून याचे प्रात्याक्षिक देखील दाखवून दिले आहे.

गरम पाण्यात डिटर्जंट आणि डेटॉल चा वापर:-

व्हिडिओमध्ये हिना मास्क आणि ग्लोव्ह्ज परिधान करताना दिसत आहे. तिने बादलीत गरम पाणी घेतले आणि त्यात डिटर्जंट आणि डिटॉल मिक्स केले.

हिना म्हणते की साबणाने या विषाणूचा नाश होतो आणि सर्वत्र सध्या  सॅनिटायझर्सची कमतरता आहे यामुळे साबण हा चांगला पर्याय आहे. यानंतर हिना एक एक भाजी बादलीत घालत आहे आणि धुत आहे.

हे का आवश्यक आहे त्याबद्ल देखील तिने सांगितले:-

हिना खानने व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करुन लिहिले आहे की ती सर्व व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्याचा आपला मार्ग शेअर  करण्याचा प्रयत्न करीत आहे.

कारण आपण सर्वजण बाहेरून किराणा सामान आणतो आणि त्यात काही धोकादायक व्हायरस असू शकतात. म्हणून ते सामान स्वच्छ करणे गरजेचे आहे.

भाज्या धुवून उन्हात वाळवा:-

हिनाने आपल्या व्हिडिओमध्ये असेही सांगितले आहे की गरम पाणी आणि साबण प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असतात.

हिना म्हणते बरेच लोक हातांनी दुध आणि ज्यूसच्या पाकिटांना स्पर्श करतात. या पॅकेटवर व्हायरस असू शकतो म्हणून हिना हे सगळे सामान प्रथमतः बाल्कनीच्या सूर्यप्रकाशामध्ये काही वेळ ठेवूनच मगच त्याचा स्वयंपाकामध्ये उपयोग करते.

लॉकडाऊनमुळे देशात सर्व प्रकारच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे कोणतीही व्यक्ती कोठेही जाऊ शकत नाही. हिना खान यामुळे अस्वस्थ झाली आहे. तिनेअजून  एक व्हिडिओही शेअर केला आहे ज्यामध्ये ती जुने फ्लाइट तिकिट पाहून रडताना दिसतेय.

हिना खानने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक मजेदार व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात हिना खान आपल्या बॅग्स स्वच्छ करताना दिसतेय त्यातच तिला तिच्या एका बॅगमधून एक वस्तू सापडते .

आणि ती बघून हिना खूपच भावनिक होते. ही वस्तू म्हणजे तिचे फ्लाइटचे एक जुने तिकिटे आहे.  हे तिकिट बघून तिला खूप रडू कासळते. या सीनच्या बॅकग्राऊंडमध्ये जाने कहां गए वो दिन हे गाणेही वाजत असल्याचे ऐकू येते.

हा मजेदार व्हिडिओ शेअर करताना हिनाने लिहिले आहे आपला भूतकाळ कधीही आपल्याला सोडत नाही. लॉकडाऊन प्रवासी निर्बंध आणि जगातील हे संक्रमण पाहून कुठलाही प्रवासी चिंताग्रस्त होऊ शकतो.

जेव्हा बॅग स्वच्छ करताना मला माझे हे जुने बोर्डिंग पास दिसले तेव्हा माझ्याबाबतीतही हे घडले आहे. आपण आपले पंख पुन्हा पसरवेपर्यंत आनंदी रहा.

सध्या सोशल मीडियावर अनेक अभिनेत्रींचे डान्स चॅलेंज देखील व्हायरल होताना दिसत आहेत. अभिनेत्री सान्या मल्होत्रा पासून तर मिथिला पालकरपर्यंत अनेक अभिनेत्रींनी जेनिफर लोपेजचं डान्स चॅलेंज केलं आहे.

अशात हिना खान हिनंही बादशाहचं नवीन गाणं गेंदा फूलवर बेली डान्स करण्याचा प्रयत्न केला. तिनंही तिच्या इंस्टावरून याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *