90 च्या दशकाची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्य भारती च्या नि धनाला 27 वर्षे झाली आहेत. अलीकडे साजिद नाडियाडवालाची दुसरी पत्नी वर्धा हिने दिव्य भारतीबाबत मोठा खुलासा केला. व
सांगितले की आज दिव्या भारती आपल्यासोबत शारीरिकरित्या नसूनही मनामध्ये आहे. पण ती नेहमीच कुटुंबाच्या आठवणींमध्ये असते. मी कधीही दिव्याचे स्थान घेण्याचा प्रयत्न केला नाही असे वर्धाने देखील सांगितले.
वर्धा म्हणाली- साजिदने माझ्याशी दुसरे लग्न केले असेल. पण मी त्याच्या आयुष्यात कधीही दिव्याचे स्थान घेण्याचा प्रयत्न केला नाही. वर्धा पुढे म्हणाली की जेव्हा जेव्हा मुले चित्रपटात दिव्याला पाहतात तेव्हा ते तिला मोठी आई म्हणून संबोधतात. दिव्या भारतीचे वडील आजही साजिदला मुलाप्रमाणे वागवतात.
वर्धने पुढे सांगितले की साजिद अजूनही दिव्याच्या आईवडिलांना मुलासारखा भेटतो. दिव्याचे वडील आणि साजिद किती जवळ आहेत याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मी कधीही दिव्याची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही.
मी माझी स्वतःची जागा तयार केली आहे म्हणूनच मला ट्रोल करणे थांबवा. दिव्या सुद्धा माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कधीकधी लोक म्हणतात की दिव्या ही वर्धा पेक्षा खूप चांगली होती. ती आता असती तर खरंच बरं झाल असत आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो.
आपणास माहिती आहे का की दिव्या भारतीने 10 मे 1992 रोजी साजिद नाडियाडवालाशी लग्न केले. दिव्या भारतीने आपला ध र्म बदलून साजिदशी लग्न केले. त्याने तीचे नाव सना असे ठेवले होते. पण लग्नानंतर सुमारे 11 महिने दिव्या भारतीचे वयाच्या 19 व्या वर्षी रहस्यमय पद्धतीने मृ त्यू झाला.
असे म्हटले जाते की दिव्या भारती चा मृत्यू पाचव्या मजल्यावरून पडल्यामुळे झाला . मात्र आजपर्यंत तिच्या मृ त्यूचे गूढ समोर आले नाही. बॉलिवूडमध्ये दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीला एक अशी अभिनेत्री म्हणून लक्षात ठेवले जाते की जिने ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि अदांनी सर्वांनाच घायाळ केले होते. २५ फेब्रुवारी १९७४ मध्ये मुंबईत दिव्याचा जन्म झाला.
साधारणतः १९९० मध्ये दिव्याने तिच्या सिनेकरिअरची सुरुवात बोबली राजा या तेलगु सिनेमाने केली. २ वर्षांनी तिने आपली नजर बॉलिवूडकडे वळवली. १९९२ मध्ये तिचा विश्वात्मा हा पहिला हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमातले सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गयी हे गाणे फार प्रसिद्ध झाले होते.
हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. १९९२ मध्येच दिव्याचा शोला और शबनम दिल का क्या कसूर दीवाना बलवान दिल आश्ना है यांसारखे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले होते.
दीवाना या सिनेमासाठी दिव्याला फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. १९९२ ते १९९३ या एका वर्षात दिव्याने १४ हिंदी सिनेमांत काम केले. एखाद्या नवीन कलाकाराने पदार्पणाच्याच वर्षी १४ सिनेमात काम करण्याचा रेकॉर्ड आजही दिव्या भारतीच्याच नावावर आहे.
शोला और शबनम या सिनेमाच्या सेटवर फिल्ममेकर साजिद नाडियाडवाला गोविंदाला भेटायला गेला होता. तेव्हा त्याची ओळख दिव्या भारतीशी झाली. त्यानंतर दिव्या १९९२ मध्ये साजिद नाडियाडवालासोबत विवाह बंधनात अडकली.
तेव्हा दिव्या भारती केवळ १८ वर्षांची होती. पण लग्नाच्या केवळ एक वर्षांनंतर ५ एप्रिल १९९३ मध्ये दिव्याचा राहत्या घराच्या पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यु झाला. दिव्याच्या मृत्यूनंतर तिचे रंग आणि शतरंज हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. रंग हा सिनेमा तेव्हा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट सिनेमा ठरला होता.