बॉलिवूडची दुनिया खूप रंगीन आहे. आपल्या सर्वांना या स्टार्सच्या समृद्ध लाइफस्टाइल खूप आवडते. या बॉलिवूड स्टार्सकडे खूप पैसे असतात. फ्लॉप स्टार्ससुद्धा आपले आयुष्य आरामात जगत असतात.
याचे एक कारण असे आहे की बर्याच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाला इतर व्यवसायांशी जोडले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे खूप पैसे असतात. अशा प्रकारे ते अगदी महागडे छंद देखील पूर्ण करतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा काही खास स्टार्सशी ओळख करुन देणार आहोत ज्यांचा साइड बिझिनेस त्यांना श्रीमंत बनवित आहे.
बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमवयाचे असे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि लोक या टप्प्यावर पोहोचण्यासाठी खूप मोठी मेहनत करत असतात आणि बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावत असतात परंतु प्रत्येकाला येथे यश मिळेलच असे नाही खूप जणांना येथे निराशा येत असते.
पण याचा अर्थ असा नाही बॉलिवूडमध्ये व्यक्ती यशस्वी झाला नाही तर तो त्याच्या आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अश्या स्टार्स ची नावे सांगणार आहोत जे बिझनेसमेन म्हणून अधिक यशस्वी आहेत. चला तर मग त्यांची नावे जाणून घेऊया.
१. अभिषेक बच्चन:- अभिषेक बच्चनला आतापर्यंत बरेच चित्रपट मिळाले आणि त्याने ते चित्रपट केले आणि आपली एक ओळख निर्माण केली आहे पण आपणास हे माहिती नसेल की अभिषेक एखाद्या अभिनेत्यापेक्षा तो एक चांगला बिजनेसमैन आहे. अभिषेकने प्रो कबड्डी मधील जयपूर पिंक पँथर्स आणि फुटबॉल मधील चेन्नईयीन एफसीचा मालकी हक्क त्याच्याकडे आहे. त्याचवेळी अभिषेकची ब्रीथ 2 मालिकाही त्याने स्वतः तयार केली असून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरही तो आला आहे.
२. मलायका अरोरा:- मलायका अरोराला सध्या कोणतेही काम मिळत नाही परंतु ती नेहमीच तिच्या चाहत्यांची पहिली पसंती राहिली आहे. कामा बद्दल बोलताना मलायकाने इंडियाज गॉट टॅलेंट सारख्या रियालिटी टीव्ही शोमधून खूप पैसे कमावले आहेत. याशिवाय ती सुजेन खान आणि बिपाशा बासू यांच्यासोबत द लेबल लाइफ नावाच्या ई-कॉमर्स वेबसाइटची मालकीण आहे. तसेच मलायका तिच्या कपड्यांच्या लाइनवरही सध्या काम करत आहे.
३. प्रीती झिंटा:- डिंपल गर्ल प्रीती झिंटाने बॉलिवूडमध्ये एक चांगले करीयर केले होते त्याचबरोबर ती एक यशस्वी बिजनेस वूमन म्हणूनही आयपीएलच्या किंग इलेव्हन पंजाब ची मालकीण आहे. अजून तिने 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टी -20 ग्लोबल लीगच्या स्टालिनबॉश किंग्ज फ्रेंचायझी देखील विकत घेतली आही. ती सध्या खूप पैसे कमवत आहे.
४. अर्जुन रामपाल:- बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल हा शेवटी 2017 मध्ये आलेल्या डॅडी चित्रपटात गँगस्टर अरुण गवळीच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय अर्जुन हा एलएपी नावाच्या दिल्ली नाईटक्लबचा मालक देखील आहे. सध्या तो एक यशस्वी बिजनेसमैन आहे.
५. ट्विंकल खन्ना:- ट्विंकल खन्ना ही एक यशस्वी लेखिका आहे. तिचे लेख बर्याचदा टाइम्स ऑफ इंडियामध्ये दिसून येत असतात. आतापर्यंत तिने तीन पुस्तके लिहिली आहेत या व्यतिरिक्त २०१६ मध्ये ट्विंकलने राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट पॅडमॅन ची निर्मिती केली होती. तीचे मुंबईत दोन इंटिरियर डिझाइन स्टोअर्स देखील आहेत. ट्विंकलने नुकतेच ट्विक इंडिया नावाची डिजिटल मीडिया कंपनी सुरू केली आहे ट्विंकल एक यशस्वी बिझनेस वूमन आहे.