पूर्वी आपल्या देशात बालविवाह म्हणून एक प्रथा प्रचलित होती या प्रथेमध्ये मुलींना लहान वयातच लग्नात भाग पाडले जात असे. लहान वयातच लग्न झाल्यामुळे त्यांना लहान वयातच आई बनावे लागत असत. परंतु अशा बर्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वतःच्या इच्छेतून कमी वयातच स्वतःला आई बनविण्याचा निर्णय घेतला. चला आज अशाच काही अभिनेत्रींबद्दल बोलूया.
१. उर्वशी ढोलकिया:- भास्कर डॉट कॉम या वेबसाइटनुसार प्रसिद्ध अभिनेत्री उर्वर्शी ढोलकिया यांचे वयाच्या 15 व्या वर्षी लग्न झाले आणि वयाच्या 16 व्या वर्षी सागर आणि क्षितिज या जुळ्या मुलांची त्या आई झाल्या होत्या. लग्नानंतर दीड वर्षानंतर त्या आपल्या पतीपासून वेगळे झाल्याचे बोलले जाते. यानंतर दोन्ही मुलांचे पालनपोषण अविवाहित आई म्हणून त्यांनी केले आहे.
2. डिंपल कपाडिया:- एमएसएन डॉट कॉम या वेबसाईटवर दिलेल्या वृत्तानुसार डिम्पल कपाडिया आपल्या पहिल्या चित्रपटाच्या शू टिंग दरम्यान स्टार राजेश खन्नाच्या प्रेमात पडली. चित्रपटाच्या शू टिंगनंतर दोघांनी लग्न केले होते त्यावेळी डिंपल कपाडिया अवघ्या 16 वर्षांची होती आणि डिम्पलने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ट्विंकल खन्नाला जन्म दिला.
डिंपल कपाडिया यांनी वयाच्या १६ व्या वर्षी राज कपूर दिग्दर्शित बॉबी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या सेटवर डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि या दोघांनी लग्न केलं.
डिंपल आणि राजेश खन्ना यांच्यामध्ये १५ वर्षांचं अंतर आहे. मात्र तरीदेखील या दोघांनी लग्न केलं. विशेष म्हणजे केवळ १७ व्या वर्षी डिंपल या ग रोदर राहिल्या. एवढ्या कमी वयामध्ये गरोदर असलेल्या डिंपल यांनी एका मुलीला जन्म दिला.
3. नीतू सिंग:- ऋषी कपूरची पत्नी नीतू सिंगनेही आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती नीतू सिंगने वयाच्या २२ व्या वर्षी अभिनेता रणबीर कपूरची मोठी बहीण रिद्धिमा कपूर यांना जन्म दिला होता.
ऋषी कपूर आणि नीतू कपूर बॉलिवूडमघ्ये ऑल टाईम हीट जोडी म्हणून ओळखले जायचे. अभिनेते अनुपम खेर यांच्या टेलिव्हिजन कार्यक्रमात त्यांनी एकदा उपस्थिती लावली होती.नीतूशी झालेली भेट भेटीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झालेले रुपांतर हा संपूर्ण प्रवास ऋषि कपूर यांनी कार्यक्रमात सविस्तर उलघडून सांगितला होता.
मला आठवते त्यावेळी माझे माझ्या प्रेयसीसोबत भांडण झाले होते. मी भरपूर दु:खी होतो. तिला पुन्हा मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू होते. त्यावेळी नीतू मला माझ्या प्रेयसीला पत्र लिहीण्यासाठी मदत देखील करत होती. तेव्हा मी आणि नीतू जेहरीला इन्सान चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने एकत्र होतो. पण नंतर जस जसा वेळ पुढे गेला मी नीतूला मिस करत असल्याची जाणीव होऊ लागली.
युरोपमध्ये चित्रीकरणात व्यस्त असताना नीतूच्या आठवणीने मी तिला तेथून पत्र लिहीले. ‘मला तूझी आठवण येतेय एवढंच पत्रात लिहीले होते आणि या पत्रापासूनच आमच्या प्रेमकहाणीचा पहिला अध्याय सुरू झाला असे ऋषी कपूर यांनी सांगितले होते.
4. भाग्यश्री:- मैंने प्यार किया या चित्रपटाद्वारे भाग्यश्रीला मुख्य ओळख मिळाली. या चित्रपटात तिने सलमान खानसोबत काम केले होते. या चित्रपटामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटा नंतर भाग्यश्री हिमायाल दासानीशी लग्न केले होते त्यावेळी भाग्यश्री फक्त 17 वर्षांची होती आणि भाग्यश्री लग्नाच्या तीन वर्षानंतर 20 व्या वर्षी आई बनली.
हिमालयसुद्धा बॉलिवूड अभिनेता आहे. पत्नी भाग्यश्रीसोबत त्याने काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भाग्यश्री व हिमालयचा मुलगा अभिमन्यू याने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मर्द को दर्द नहीं होता या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.