हे घरगुती उपाय केल्यास पाल कधीच येणार नाही घरात, निघून जाईल इतकी दूर की विसरेल घराचा पत्ता…

Entertainment

स्वच्छता राखण्यासाठी आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांच्यामुळे आश्चर्यचकित होण्यापासून रोखण्यासाठी आपले घर कीटकमुक्त ठेवणे महत्वाचे आहे. आपण अनेकदा पाहिले असेल. लहान मुले जेवण करत नसतील किंवा रडत असतील अशावेळी घरातील मोठी माणस मुलांना घरातील भिंतीवर दिसणारी पाल दाखवून भिती दाखवतात. पाल पाहून लहान मुलं शांत बसतात.

तसेच भिंतीवरून फिरणारी पाल अचानक खाली पडली तर लहान मुलेच काय तर मोठी माणसं देखील गोंधळून जातात. आपल्या घरांमध्ये, किचनमध्ये, भिंतीवर किंवा कोपऱ्यात अशा सर्व ठिकाणी पाली पाहायला मिळतात. या पाली खूप विषारी असतात. तसेच या पाली पाहून आपल्याला भिती वाटते आणि किळस देखील वाटते.

पालीला हाकलण्यासाठी विषारी लिक्विड उपलब्ध आहेत, पण त्याच्या वापर करताना कुणी दिसत नाही, विषारी लिक्विड असल्याने ते वापरले जात नसावे. तुम्हाला पण पालेची भिती वाटते का? वाटत असेल तर नक्कीच पूर्ण माहिती वाचा.

घरगुती उपायांनी पालीची सुटका कशी करावी?

१. रिकाम्या अंड्याच्या कवचाचा वापर करा :- पालीपासून सुटका मिळवण्यासाठी, तुम्ही तुमच्या घराच्या ज्या भागात पाली भेट देतात त्या ठिकाणी अंड्याचे कवच ठेवू शकता. अंड्याचे कवच वापरण्यापूर्वी ते स्वच्छ पुसून टाका. याव्यतिरिक्त, त्यांचा उग्र सुगंध टिकवून ठेवण्यासाठी त्यांना धुणे टाळा. घरातून पाल बाहेर काढायचा हा मार्ग खूप प्रभावी आहे.

२. मोरपंख :- पालींना मोरपंख पाहून साप असल्याचा भास होतो, असे म्हणतात. साप त्यांना खाऊन टाकेल या भीतीने त्या तेथून पळ काढतात. घराच्या फ्लॉवरपॉटमध्ये मोरपंख ठेवा, पाली पळून जातात.

३. कॉफी :- पाल घरातून दूर करण्यासाठी कॉफी पावडर देखील वापरली जाऊ शकते. यासाठी कॉफी पावडरमध्ये तं’बाखू मिसळा आणि त्याचे छोटे गोळे बनवा. जिथे पाली जास्त येतात, तिथेच ठेवा.

४. लसूण :- दारे, खिडक्या इत्यादींवर लसणाच्या पाकळ्या ठेवा. त्यामुळे पाली घरात येणार नाहीत. बहुतेक वेळा पाली पाढंर्‍या रंगाला घाबरताना दिसतात. लसणाचा दर्पही पालींसाठी असह्य असतो. त्यामुळे लसणाचाही वापर तुम्ही करु शकता.

५. डांबर गोळी :- पालीपासून मुक्त होण्यासाठी नॅप्थालीन बॉल्स देखील मदत करू शकतात. म्हणूनच तुम्ही त्यांना त्या ठिकाणीही डांबर गोळी ठेवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *