हिवाळ्यात निरोगी ठेवणारे डिंकाचे लाडू! वाचा…

Health Interesting Uncategorized

ऋतू बदलण्यासोबतच आपलं आरोग्य राखण्यासाठी आपल्याला खाण्या-पिण्यातही बदल करावे लागतात. उन्हाळ्यात राहुन राहुन काहितरी थंडगार प्यावेसे वाटते तर पावसाळ्यात गरमागरम आणि चटकदार खावेसे वाटतं. पण हिवाळ्यात मात्र थोडं वेगळं असतं. यात थंडीपासून बचाव करण्यासाठी तसेच शरीर उबदार ठेवण्यासाठी आरोग्यदायी पदार्थ खावे लागतात.

हिवाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या देशात कुटुंबातील आजी-आजोबा डिंकाचे लाडू खाण्याचा सल्ला देतात. डिंकाचे लाडू खायला चवदार असतात तसेच त्यांच्यात अनेक पौष्टिक गुणधर्म देखील असतात. या लाडूचे सेवन केल्याने हिवाळ्यात होणाऱ्या हाडे आणि स्नायूंच्या वेदना कमी होण्यास मदत होते. तर मग उशीर कशाला डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते शिकूया.

डिंक लाडू बनवण्यासाठी साहित्य –

200 ग्रॅम पीठ
1 कप गावरान गायीचे तूप
1 कप पिठी साखर
1 कप खाण्याचा डिंक
50 ग्रॅम चिरलेली काजू
50 ग्रॅम चिरलेली बदाम
50 ग्रॅम खरबूजच्या बिया

डिंकाचे लाडू बनवण्याची पद्धत – डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सर्व प्रथम गॅसवर एक कढई गरम करा, मग त्यात तूप घाला आणि मध्यम आचेवर त्यात डिंकाचे तळून घ्या. जेव्हा डिंकाचा रंग बदलून सोनेरी तपकिरी होईल तेव्हा गॅस बंद करा. डिंक थंड होऊ द्या आणि मग तो मिक्सरमध्ये बारीक करा आणि बाजूला ठेवा. आता कढईवर तूप गरम करून त्यात पीठ टाकून त्याचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत ते भाजून घ्या. परंतु हे लक्षात ठेवा की पीठ अजिबात जळाले नाही पाहिजे. यानंतर पिठात डिंक, काजू, बदाम आणि खरबूज बिया घाला आणि गॅस बंद करा. नंतर हे मिश्रण कढई मधून बाहेर काढा आणि थंड होऊ द्या. आता डिंक आणि पिठाच्या मिश्रणात पिठी साखर मिसळा आणि त्याचे गोल-गोल लाडू बनवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Live64media याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *