सलमान खान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. सलमान खान अनेक अभिनेत्रींसोबतच्या नात्यांमुळे चर्चेत असला तरी अशीच एक अभिनेत्री आहे जिला सलमान खान अजून विसरु शकलेला नाही. बॉलिवूडमध्ये झपाट्याने आपले पाय रोवणाऱ्या कियारा अडवाणीचे बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत एक घट्ट नाते आहे.
ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत असेल, पण कियाराच्या कुटुंबासोबत सलमान खानचे खूप चांगले संबंध आहेत. कियाराने स्वतः एका मुलाखतीत सलमान खानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान अनेकदा त्याच्या नात्यांमुळे चर्चेत असतो.
बॉलिवूड दबंग सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. चित्रपट सृष्टीतील येण्यापूर्वी सलमान खानला कियाराची मावशी खूप आवडत असे. तो तिच्यासाठी कॉलेजच्या गेटबाहेर तासनतास थांबायचा. दोघांच्या नात्यात दुरावा का आला ते जाणून घेऊया. यादरम्यान त्याने अनेक अभिनेत्रींना डेटही केले.
ज्यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय ते कतरिना कैफ यांच्या नावांचाही समावेश आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, सलमान खान पहिल्यांदा कियारा अडवाणीच्या मावशीच्या प्रेमात पडला होता. बॉलीवूडचा दबंग सलमान खानवर जासिम खानने लिहिलेल्या ‘बीइंग सलमान’ या चरित्रात त्याच्या पहिल्या मैत्रिणीचा उल्लेखही करण्यात आला आहे. सलमानच्या पहिल्या प्रेमाबद्दल बोलायचे झाले, तर त्याचे पहिले प्रेम शाहीन जाफरी आहे.
सलमान आणि शाहीनचे प्रेम त्यावेळी खूप चर्चेत होते. त्यावेळी सलमानने चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यावेळी सलमान मुंबईतील कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात होता. सलमानचे वय अवघे १९ वर्षे होते. शाहीननेही त्याच्यासोबत याच कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. सलमान तिच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, तो गेटबाहेर तासन् तास तिची वाट पाहत असे.
सलमानचे तिच्यावर इतके प्रेम होते की त्याने आपल्या कुटुंबाची शाहीनशी ओळख करून दिली. दोघांच्या घरच्यांनीही या नात्याला होकार दिला होता. दोघांचे लवकरच लग्न होणार असे लोकांना वाटत होते. पण संगीता बिजलानीने या नात्याच्या मध्ये प्रवेश केला. सलमान आणि शाहीन मुंबईतील एका हेल्थ क्लबमध्ये जायचे आणि तिथे संगीताही यायची. यानंतर शाहीनची एअरलाइनमध्ये नोकरी करू लागली. त्यामुळे सलमान आणि त्याच्यात दुरावा निर्माण झाला होता.
त्याचवेळी सलमान हळूहळू संगीताच्या प्रेमात पडला होता. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण नंतर संगीताने या लग्नाला साफ नकार दिला. असेही म्हटले जाते की, संगीताने सलमानला इतर अनेक मुलींना डेट करताना पाहिले होते, त्यामुळे तिला सलमानसोबत लग्न करायचे नव्हते. त्यानंतर संगीतानेही सलमानसोबतचे नाते तोडले.
ब्रेकअपनंतरही ते दोघे अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. संगीता बिजलानी अभिनेत्री कियारा अडवाणीची मावशी असली तरी. सलमान खानने आजपर्यंत लग्न केलेले नाही. बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना डेट करूनही त्यांनी लग्न केले नाही.