कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये लोक उन्हाने त्रस्त होतात. सततचा घाम, चिकटपणा, दररोजच कामाचं रुटिंग यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि उन्हाळ्यात गारव्याचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनारी धाव घेत असतात. यावेळी बिनधास्त कोणतीच फिकर न करता सर्वजण आनंद लुटत असतात.
मात्र, कल्पना करा की तुम्ही नदी किंवा समुद्रात अंघोळ करत आहात किंवा तुमच्या मित्रांसोबत आनंद लुटत आहात आणि याचवेळी अचानक आकाशातून उडणारे विमान तुमच्या जवळ येऊन पाण्यात पडते. साहजिकच तुमच्या संवेदना उडाल्या असतील आणि काही काळ काय आणि कसे झाले हे समजू शकणार नाही. अशीच एका घटनेने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ :- संबंधित सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक लोक समुद्रात होण्यासाठी गेले होते. अशातच अचानक त्या पोहणाऱ्या व्यक्तींच्या शेजारी एक भले मोठे आकाशात उडणारे विमान खाली येऊन पाण्यात पडले. या घटनेनंतर आजूबाजूला पोहत असलेले लोक सैरावैरा पोहत किनार्याकडे गेले. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही थक्क होईल. हा व्हिडिओ प्रचंड भयानक आहे. काळजावर दगड ठेवून हा व्हिडिओ पहावा लागणार आहे.
नक्की व्हिडिओमध्ये काय आहे :- दरम्यान, हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट झाला असून ओसीएनाहोलिक लाईफ या नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओ पाहून अनेक लोक थक्क होऊन या वर कमेंट देखील करत आहेत. तसेच, या व्हिडिओला एक लाखाहून अधिक लाइक मिळालेली ही आहेत.
या विमानाला पाण्यातून बाहेर काढण्यात आलेले असून या विमानाचा चालक देखील सुखरूप बचावलेला आहे. तसेच, विमान पाण्यात पडण्याचे कारण आहे त्याला विचारण्यात येत आहे. या सर्व गोष्टी खूप भयानक आहेत. त्याचवेळी विमानाचा चालक देखील खूप घाबरला आहे.
विमान कोसळल्याने काय झाले नुकसान? :- संबंधित घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नसून, या घटनेमुळे समुद्रकिनारी राहत असणारे स्थानीक आणि पर्यटक घाबरले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच, ही घटना फ्लोरिडा देशामध्ये घडली असून विमान कोणत्या कारणामुळे समुद्रात पडले हे अद्याप समजलेले नाही.
तसेच, या विमानाला समुद्रात पडल्यावेळी धूर निघत असल्याने अनेकजण यामध्ये काही तांत्रिक बिघाड होऊन विमान समुद्रात पडले असल्याचा सांगत आहेत. परंतु, याबाबत अद्याप कोणतीच ठोस माहिती सापडलेली नाही.