भारतात क्रिकेटपटूंना कायम प्रेम आणि आदर मिळतो. टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना सेलिब्रिटीजसारखी वागणूक मिळत असते आणि त्यांच्या कामगिरीचीदेखील तेवढी प्रशंसा केली जाते. या गोष्टींमुळे क्रिकेटपटूंना लोकप्रियता मिळतेच पण काहींना या लोकप्रियतेचा तोटादेखील होतो. चाहत्यांना क्रिकेटपटूंचे खासगी आयुष्य जाणून घेण्यात खूप रस असतो. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या खासगी आयुष्यातील गोष्टींच्या चर्चाही सार्वजनिकपणे उघडकीस केल्या जातात.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह मैदानावर आपल्या धारदार गोलंदाजीमुळे विरोधी संघाला नेहमीच त्रास देत असतो. आपल्या सर्वांना माहितच आहे की बुमराह केवळ भारतच नव्हे तर जगातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या श्रेणीमध्ये येतो.
बुमराहचे अद्याप लग्न झाले नाही परंतु तो नेहमीच एका मुलीबद्दल चर्चेत असतो. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला या दोघांच्या प्रेमसं-बंधांबद्दल सांगणार आहोत. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्या टी -20 सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीने सर्वांनाच चकित केले आहे.
आपल्या माहितीसाठी आम्ही सांगतो की जसप्रीत बुमराहच्या अतिशय सुंदर मैत्रिणीचे नाव अनुपमा परमेश्वरन आहे. अनुपमा परमेश्वरन ही साउथ ची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिच्या सुपरहिट चित्रपटांमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर प्रसिद्ध असते. अनुपमा इतकी सुंदर आहे की तीच्या सौंदर्याची लोक सनी लिओनीबरोबर स्पर्धा करतात. जसप्रीत बुमराह सोशल मीडियावर फक्त एका अभिनेत्रीला फॉलो करतो आणि ती म्हणजे अनुपमा परमेश्वरन. त्यामुळे या चर्चा रंगल्या जात आहेत.
अनुपमा परमेश्वर आपल्या अतिशय सुंदर तसेच साध्यापणामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. अनुपमानंनं इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रेमम या चित्रपटातून तिनं चित्रपटांमध्ये पदार्पण केलं.
गोंडस आणि हसऱ्या चेहऱ्यामुळे तिनं फार कमी दिवसात मोठा चाहतावर्ग केला आहे. आपल्या मोहक अदांनी अनुपमानं चाहत्यांच्या मनात घर केले आहे. अभिनयासोबतच सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम करत आहे. पहिल्या चित्रपटासाठी तिला मोस्ट पॉपुलर एक्ट्रेचा पुरस्कार मिळाला होता. मल्याळम तेलगु आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम केलं करत आहे.
जसप्रीत बुमराह अद्याप त्यांच्या नात्याबद्दल काही बोलू शकला नाही, परंतु अनेकवेळा मुलाखतीच्या वेळी जसप्रीत बुमराह म्हणाला की अनुपमा परमेश्वरन त्याला खूप आवडते. अनुपमा परमेश्वरन हिने मात्र अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
पण आता अनुपमाने तिची बाजू मांडली आहे. तिने बुमराहसोबतच्या सं-बंधावरील चर्चा फेटाळून लावली आहे. तिच्या मते ती आणि बुमराह फक्त एक चांगले मित्र मैत्रिणी आहेत. यापूर्वीही जसप्रीत बुमराह तेलगू अभिनेत्री राशी खन्नाला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र एका चॅट शोमध्ये राशीने तिच्या अफेअरची न्यूज ही एक अफवा असल्याचे म्हटले.
जसप्रीत बुमराह च्या आधी आणखी बऱ्याच भारतीय क्रिकेटपटूंच्या अफेअरच्या बातम्या आल्या आहेत. हार्दिक पंड्या शुभमन गिल आणि ऋषभ पंत या खेळाडूंची नावे बॉलीवूड अभिनेत्रींसह घेण्यात आली आहेत. तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची सुवर्ण संधी भारतीय संघाकडे आहे. जर संघाने सध्याची कामगिरी सुरू ठेवली तर तो पुन्हा एकदा विश्वविजेता बनू शकतो. रोहित शर्मा आणि केएल राहुल भारताकडून फलंदाजीद्वारे सातत्याने धावा काढत आहेत.
विश्वचषकात खेळल्या गेलेल्या 8 सामन्यात 17 विकेट घेतल्यानंतर जसप्रीत बुमराह या स्पर्धेच्या अव्वल गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह संघासाठी अधिक फा-यदेशीर ठरू शकेल. दबावाखाली बुमराहची कामगिरी नेहमीच चांगली असते. जर भारतीय संघाला अंतिम सामन्यात जायचे असेल तर बुमराहला सुरुवातीच्या षटकात विकेट घ्याव्या लागतील.