करीना कपूर खान आणि पटौदी घराण्याचा नवाब सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान खूप गोंडस आहे. करीना तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते आणि ती नेहमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. करीना एक चांगली तज्ञ आई देखील बनली आहे आणि हे फारच कमी लोकांना माहित आहे. सेलिब्रिटींची मुलंही अनेकदा माध्यमांचंव आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. सेलिब्रिटी किड्सच्या याच यादीत अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे तैमूर अली खान. अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा मुलगा तैमूर जेव्हा जेव्हा माध्यमांसमोर येतो तेव्हा प्रत्येक वेळी त्याच्या चेहऱ्यावर असणारे निरागस भाव आणि हास्य सर्वांचीच मनं जिंकून जातो.
तैमूरच्या जन्मापूर्वीच करिनाने मुलांच्या संगोपनावर इतके संशोधन केले की तिला आई होण्यापासून मुलाच्या जन्मापर्यंतचे सर्व मार्ग माहित झाले होते. एवढेच नव्हे तर करिनाने मुलांना कशा प्रकारे कायम निरोगी ठेवता येईल यासाठी संशोधन केले. याविषयी करीना अन्य लोकांनाही माहिती देते. मुंबईत मुलांच्या आरोग्याशी सं बंधित एक कार्यक्रम झाला ज्यामध्ये करीनाने लोकांना आपल्या ज्ञानाविषयी सांगितले. करिना येथे आई बनण्याचे आपले अनुभव सांगितला आणि ती सुद्धा तैमूरची काळजी कशी घेते हे तिने सांगितले.
तैमूरबद्दल करिना म्हणाली की तैमूरच्या जन्मानंतर माझे आयुष्य खूप बदलले आहे. प्रत्येक आई आपल्या मुलाच्या आरोग्याची काळजी घेते आणि जेव्हा एखाडे मुल आजारी पडते तेव्हा संपूर्ण घर अस्वस्थ होते. करिनाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की मुलांना रोगांपासून वाचवण्याचा पहिला मार्ग म्हणजे लसीकरण करणे. या लसी जन्मापूर्वी आणि जन्मानंतर मुलाचे सर्व आजारांपासून संरक्षण करतात. मीसुद्धा स्वतःला लसी दिल्या आहेत आणि जन्मा नंतर तैमूरला सर्व लस दिल्या आहेत.
बॉलिवूडमधील सतत चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेता सैफ अली आणि करिना कपूर. अगदी चित्रपटांच्या प्रमोशपासून ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापर्यंत अनेक बातम्यांसाठी हे दोघेही कायमच चर्चेत असतात. या दोघांबरोबरच त्यांचा मुलगा तैमुरही नेहमीच चर्चेत असतो. मग त्याच्या नावाने बाजारात आलेल्या बहुल्या असो किंवा त्याचे व्हायरल झालेले फोटो असून तैमुर हा अगदी लहानपणापासूनच सेलिब्रिटी झाला आहे. येत्या २० डिसेंबर रोजी तैमुर तीन वर्षांचा झाला आहे.
सातत्याने मीडियाच्या नजरेत असणारा करीना आणि सैफचा अली खानचा मुलगा तैमूर अली खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. हुबेहुब तैमुरसारखा बाहुला केरळच्या बाजारात पाहायला मिळतोय. आपल्या आई-वडीलांप्रमाणेच हा तैमूरही कोणा एका सेलिब्रिटीहून कमी नाही, असंच म्हणावं लागेल.
तैमूरची हीच लोकप्रियता पाहता आता केरळमधील एका दुकानात त्याच्या नावाने खेळणं विकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गोबरे गाल निळे डोळे आणि त्या डोळ्यावर येणाऱ्या कुरळ्या केसांचा तैमूर जन्माला आल्यापासूनच सातत्याने चर्चेत असतो. सोशल मीडियावर अडीच वर्षांच्या तैमुरचा चाहता वर्ग असून त्याची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर त्याच्या इमारतीखाली गर्दी करुन असतात. करीना आणि सैफने कधीही मीडियापासून तैमूरला लपवण्याचा प्रयत्न केला नाही.
तैमूरही आता फोटोग्राफर्सना ओळखू लागला असून त्यांना पोज देणंही तो आता शिकतोय. आता याच तैमूरचा निरागस चेहरा घराघरात पाहायला मिळेल. अर्थात तैमूर या नावानेच बाहुले केरळच्या बाजारात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या बाहुल्यांच्या रुपाने तैमूर एखाद्या चित्रपट किंवा जाहिरातीत येण्याआधीच घराघरात पोहचणार आहे.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Live64media याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.