“शाहरुखच्या ह्या 5 अभिनेत्र्यांनी केलं आहे जगाला अलविदा, ह्यांच्या बद्दल क्वचितच तुम्हाला माहित असेल” …

Bollywood

बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अनेक दिग्गजांनी गेल्या काही वर्षांत जगाचा निरोप घेतला आहे आणि आम्ही देखील त्यांना लक्षात ठेवून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबद्दल इंडस्ट्री काही ना काही लिहित आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी या जगातून निघून जावून बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का दिला आहे.

परंतु आम्ही आज त्यांच्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी ऑफ रोमांसबरोबर काम केले आहे. शाहरुखच्या या नायिकांनी जगाला निरोप दिला आहे यापैकी तुमची आवडती कोणती अभिनेत्री आम्हाला नक्की सांगा.

शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये काम करण्यास जवळपास 30 वर्षे झाली असून आज शाहरुखचे नाव इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध आहे. शाहरुख खानने 3 दशकांच्या प्रवासात बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण शाहरुख खानसोबत काम करणार्‍या या अभिनेत्रींनी जगाला निरोप दिला आहे. आज आपण त्या अभिनेत्रींबद्दलच जाणून घेवू.

१. दिव्य भारती:- शाहरुख खानने आपल्या करिअरची सुरुवात दीवाना या चित्रपटापासून केली होती आणि या चित्रपटात त्याची नायिका दिव्या भारती होती. १९९३ मध्ये दिव्याचा अ पघातात मृ त्यू झाला आणि आजपर्यंत ही कहाणी कोणीही विसरलेले नाही हे सर्व नेमके कसे घडले हे आजही एक रहस्य आहे.

दिव्याने फार कमी वयात असताना जगाचा निरोप घेतला मात्र चित्रपटसृष्टीत तिने तिच्या नावाचा चांगलाच दबदबा निर्माण केला. त्यामुळे आजही ती प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. वयाच्या १४ व्या वर्षी कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या दिव्याला सुरुवातीच्या काळापासूनच अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. दिव्याने आपल्या चित्रपटात काम करावं अशी प्रत्येक दिग्दर्शकाची इच्छा होती.

२. श्रीदेवी:- बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे 2018 मध्ये दुबईच्या एका हॉटेलमध्ये नि धन झाले. हा एक अपघात होता की आणखी काय नेमका त्यांचा मृ त्यू कसा झाला याची कोणालाही माहिती नाही.

श्रीदेवी यांचे निध न झाल्यावर त्या एका चित्रपटाचे शू टिंग करत होत्या आणि यापूर्वी इंग्लिश-विंग्लिश आणि मॉम सारख्या सुपरहिट चित्रपटात देखील त्या दिसल्या होत्या. श्रीदेवीने शाहरुख खानसोबत आर्मी मध्ये काम केले होते त्याव्यतिरिक्त श्रीदेवीने झिरो चित्रपटात देखील एक पाहुणे कलाकार म्हणून दिसली होती.

३. रसिका जोशी:- अभिनेत्री रसिका जोशीने बिल्लू आणि स्वदेससारख्या चित्रपटांमध्ये शाहरुख खानबरोबर काम केले आहे. या दोन्ही चित्रपटांत रसिकाच्या कामाचे कौतुकही झाले. २०११ मध्ये रसिका यांचे निधन झाले होते. तिने इतरही अनेक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

प्रियदर्शनच्या मालामाल विकली भुलभुलय्या मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती . एनडीव्हीवरील बंदिनी यामालिकेत मोतीबेन साकारत असतानाच त्यांना कॅन्सरच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते . अखेर ७ जुलै २०११ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

४. रीमा लागू:- बॉलिवूडची सर्वात आवडती आईची भूमिका साकारणाऱ्या रीमा लागू यांचे 2017 मध्ये नि धन झाले. रीमा लागू अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी जगाला निरोप दिला. शाहरुखने रीमा लागूबरोबर कल हो ना हो येस बॉस आणि कुछ कुछ होता होता या सुपरहि ट चित्रपटात काम केले आहे.

अत्यंत ग्लॅमरस आई म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली. आपल्या वाटय़ाला आलेल्या आईच्या भूमिकेतही त्यांनी वेगळेपण ठेवत आपली दखल घ्यायला प्रत्येकाला भाग पाडले. त्यांची प्रत्येक आईची भूमिका लोकांच्या लक्षात राहिली इतक्या सहजतेने त्यांनी त्या व्यक्तिरेखा जिवंत केल्या होत्या.

५. सुधा शिवपुरी:- अभिनेत्री सुधा शिवपुरीने शाहरुख खानसोबत माया मेमसाब या चित्रपटात काम केले होते. ती टीव्ही सीरियल क्योंकि सास भी कभी बहु थी  या प्रसिद्ध सिरीयल मुळे ती मोठ्या प्रमाणात ओळखली जात होती. सुधा शिवपुरी हिचे 2015 साली नि धन झाले.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Live64media याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *