वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे असेल तर ‘या’ चुका टाळा, अन्यथा करावा लागेल आयुष्य भर पश्चाताप.

Interesting Tips Uncategorized

बदलत्या काळाबरोबरच नात्यातही बरेच नवीन बदल घडत आहेत, ज्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून नवविवाहित जोडप्यांमध्ये समस्या उद्भवू होऊ लागल्यात, जे भविष्यात भयानक रूप धारण करतात. कधीकधी परिस्थिती इतकी खराब होते की प्रकरण घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गेल्या काही वर्षांत घटस्फोटाची अशी अनेक प्रकरणे घडली आहेत ज्यांचे लग्न १ किंवा २ वर्षांपूर्वीच झाले होते. यामागील कारण म्हणजे रोजची चालबाजी आणि वादविवाद. खरं तर असं होतं की बहुतेक जोडपी लग्नानंतर एकटे राहणे पसंत करतात. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांना त्यांचे औचित्य सिद्ध करावे लागत नाही. तसेच त्यांचे परस्पर तणाव सोडविण्यास कोणीही नसत. कंटाळले असल्याने ते एकमेकांपासून विभक्त होण्याची तीव्र इच्छा बाळगतात. परंतु आपणास वाटत असेल की आपल्या लग्नानंतर अशी परिस्थिती आपल्या आयुष्यात येऊ नये आणि आयुष्य सुखी राहव, तर चुकूनही या चुका करू नका.

आपल्या Ex साठी अस्वस्थ होणे : भूतकाळ हा नेहमी भूतकाळ ठेवणे चांगला असतो. जर भूतकाळाने आपल्या वर्तमानात हस्तक्षेप करण्यास सुरवात केली तर समजून घ्या की काहीतरी खरोखरच वाईट घडू शकते. जरी आपण आपल्या Ex सोबत पूर्वीसारख्या नातेसंबंधात नसला तरी आपली तिच्याबाबतची समस्या आपल्या जोडीदारालाही त्रस्त करू शकते. हे भांडणे आणि नंतर नात्यांत फूट पडण्याचे एक मोठे कारण देखील बनू शकते.

क्षुल्लक बाबींवरून वाद घालणे : बरेचसे विवाहित जोडपे असे म्हणतात की छोटेछोटे वाद होत राहतात पण तुम्हाला माहिती आहे का की, असे छोटे वाद एक दुसऱ्याबद्दल नकारात्मकता निर्माण करतात. नंतर हे छोटेछोटे वाद मोठ्या भांडणाच रूप धारण करतात आणि मग त्यांचे निराकरण करणे कठीण होते.

एकमेकांपासून गोष्टी लपवणे : लग्नाचा अर्थ असा की, आपला आनंद त्याचा आनंद आहे, आपले दु: ख त्याचे दु: ख असतं. म्हणूनच एखाद्याने कधीही एकमेकांपासून काहीही लपवू नये. जर आपल्या जोडीदारास हे कळाले की आपण त्यांच्याकडून काहीतरी लपवले आहे तर त्यांच्या विश्वासाला तडा जातो.

जोडीदार बदलण्याचा प्रयत्न करा : आपल्या जोडीदाराला संतुष्ट करण्यासाठी कधीही स्वत: ला बदलू नका किंवा आपल्या आनंदासाठी जोडीदारास बदलण्याचा प्रयत्न करू नका. जर आपण प्रेमात असाल तर ते तुम्ही आहात तसे तुम्हाला स्वीकारतील आणि आपण देखील त्यांना आहे तसेच स्वीकारले पाहिजे. जर एखाद कुणी आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच तुमच्या असण्यापेक्षा दिसण्यावर जास्त प्रेम आहे. प्रेम करणे म्हणजे एकमेकांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर प्रेम करणे.

आपल्या भावना व्यक्त न करणे : प्रत्येकाची इच्छा असते की त्याचा जोडीदार हा त्याच्या सुख-दु:खाचा भागीदार व्हावा. ज्या गोष्टी तो कोणालाही सांगू शकत नाही, त्या आपल्या जोडीदारासोबत शेअर करून आपले मन हलके करावे. परंतु जर आपण आपल्या मनातील भावना आपल्या जोडीदाराशी शेअर न करता आपल्या मित्राशी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडे बोलत असाल तर या गोष्टीचे तुमच्या जोडीदारास वाईट वाटू शकते आणि तुमच्या नात्याला तडा जाऊ शकतो.

आपल्या जोडीदारावर संशय घेणे : संशय ही अशी गोष्ट आहे जी विवाहित जीवनात विष मिसळवते. यामुळे नाते, प्रेम, आदर आणि शांतता सगळं विस्कळीत होते. यामुळे विवाहितांचे जीवन तसेच घराचे वातावरण देखील बिघडते. त्यामुळे आपल्या जोडीदारावर विनाकारण संशय न घेणे हेच चांगले. आपला साथीदार काहीतरी चूक करीत आहे असे आपल्याला वाटत असल्यास, त्याबद्दल त्याच्याशी मोकळेपणाने बोला.

रोमान्सचा अभाव : होय, रोमान्सच्या अभावामुळे देखील बहुतेक जोडप्यांमधील नात्यात तफावत येते. असे मानतात की प्रेम दर्शविले जात नाही परंतु समजले जाते. पण काही काळानंतर प्रेम व्यक्त करणे खूप महत्वाचे ठरते. कारण कोणत्याही वेळी आपल्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा हा एकमेव मार्ग आहे. म्हणूनच नातेसंबंधात रोमान्स ठेवा आणि तो आपल्या बाजूकडून देखील ठेवण्याचा प्रयत्न करा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे.Live64media याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *