आज आम्ही तुम्हाला केव्हिन नावाच्या मुलाबरोबर झालेल्या एका घटनेबद्दल सांगणार आहोत. जी घटना वाचून आपला देखील नशिबावर विश्वास वाढेल. एका साध्या पेंटिंग मुळे त्याचे आयुष्य कसे चमकले याबद्दल आम्ही आज सांगणार आहोत.
केव्हिन हा आपल्या आईबरोबर लोकल थ्रिफ्ट दुकानात गेला. केव्हिन त्याच्या आईबरोबर एका छोट्याशा घरात राहत होता आणि तो काय फार श्रीमंत नव्हता. म्हणून तो अनेकदा या लोकल थ्रीफ्ट शॉपमध्ये कपडे वगैरे घ्यायला जात असे. नवीन कपडे त्यांच्यासाठी खूप महाग होते. या दुकानाच्या कोपऱ्यात केव्हिनला एक सुंदर पेंटिंग दिसली.
केव्हिनच्या बर्याच वेळा मागण्यामुळे त्याच्या आईने ही पेंटिंग त्याला घेवून दिली. त्याची किंमत 3 डॉलर होती. आणि हा एक चांगला निर्णय ठरला. हा लहान मुलगा या जुन्या शैलीच्या पेंटिंगच्या प्रेमात पडला हे पाहून त्याच्या आईला आश्चर्यकारक वाटते. परंतु केव्हिन हा इतर मुलांसारखा नव्हता. त्याला कला आणि प्राचीन वस्तू फार आवडयच्या आणि हे थ्रीफ्ट दुकान हे त्याचे आवडते ठिकाण होते.
जेव्हा केव्हिन आणि त्याची आई घरी परत गेले आणि जेव्हा केविन आपल्या खोलीत हि पेंटीग ठेवतो तेव्हा त्याला अचानक एक विचित्र गोष्ट दिसली. तेथे पेंटीगच्या कोपऱ्यात त्याने काहीतरी असे पाहिले ज्याची त्याला ओळख होती. पेंटिंगच्या खालच्या कोपऱ्यात केव्हिनला एक ऑटोग्राफ दिसला जो त्याला ओळखीचा वाटला. एकदा त्याने हे एका पुस्तकात पाहिले होते.
केव्हिनने एक क्षणभर आपली कल्पना बाजूला केली आणि नवीन खरेदी केलेली पेंटिंग घरात लावण्यासाठी एक चांगली जागा शोधली. ते लावताना केव्हिनच्या मनातून त्या ऑटोग्राफचा जात नव्हता. या चित्रात काहीतरी विशेष नक्की होते.
थोड्या वेळासाठी शोध घेतल्यानंतर शेवटी केव्हिनला त्याच्याकडे या ऑटोग्राफ बद्दलचे पुस्तक सापडले आणि मग त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे आश्चर्य त्याला मिळाले.
या पुस्तकाच्या पान नंबर 65 वर त्याने त्या पेंटिंगवर असलेली सहीही पाहिली. त्याने फक्त 3 डॉलर्स देऊन खरेदी केलेली पेंटीग खरे तर एका प्रसिद्ध चित्रकाराने बनवलेली होती. केव्हिनला काय करावे हे माहित नव्हते आणि त्याने आईला आपला शोध दाखवण्यासाठीतो तिच्याकडे पळत गेला.
अर्थात, सुरुवातीला आईला आपल्या मुलावर विश्वास नव्हता. हे स्वप्नासारखे वाटत होते. परंतु जेव्हा तिने हातात असलेल्या पुस्तकासह ऑटोग्राफला अधिक बारकाईने अभ्यास केला तेव्हा ती देखील आश्चर्यचकित झाली. या शोधानंतर तिच्या आईने ताबडतोब एक अँटीक डीलरला बोलावले जो त्यांच्या या पेंटिंगचे मूल्यांकन करू शकेल.
जो तिच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय ठरला. अँटीक डीलर दुसर्या दिवशी घरी आला आणि त्याने पेंटिंग पाहिल्यावर तो देखील आश्चर्यचकित झाला. तो बर्याच वेळा अडखळत म्हणाला पण हे कसं घडले.
ही एक उत्तम कलाकृती आहे. आणि यासाठी हजारो डॉलर्स खर्च होतात. जेव्हा डीलर त्यांना पेंटिंगची किंमत सांगतो तेव्हा केव्हिन आणि त्याच्या आईला दोघांनाही त्यांच्या कानांवर विश्वास बसत नाही. त्यांनी केवळ 3 डॉलर्समध्ये विकत घेतलेली ही पेंटिंग त्यांचे आयुष्य कायमचे बदलू शकत होरी. नेमके तेच घडले.
केव्हिनने या कलाकृतीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला या पेंटीग चे हजारो डॉलर्स मिळाले आणि त्याने आपल्या आईबरोबर हे पैसे शेअर केले. कारण आपल्या प्रियजनांबरोबर आनंदी आयुष्य जगणे ही सर्वात सुंदर गोष्ट आहे.