अनेकजन नदी आणि तलावांमध्ये मासे पकडण्यासाठी जात असतात. तसेच, बऱ्याचवेळा मासे पकडत असताना त्यांच्या जाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू सापडत असतात. अनोळखी ठिकाणी अशा गोष्टी सापडणे दुर्मिळ आहे ज्याचा कोणी विचारही केला नसेल. अनेकवेळा तर चक्क लोकांना धन-संपत्तीही मिळते. जे पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात.
दरम्यान, असाच एक प्रकार नुकताच इंग्लंडमधील एका तरुणासोबत घडला आहे. इंग्लंडमधील लिंकनशायरमधून एक किशोर चुंबकीय मासेमारी करत होता. मासेमारी करताना जड वस्तू त्याच्या चुंबकात अडकली. ती जड वस्तू दुसरे काही नसून लोखंडाची तिजोरी होती. यानंतर, त्याने ती तिजोरी पाण्यातून बाहेर काढली.
तरुणाने ती तिजोरी उघडली तेव्हा तो त्या तिजोरीतील वस्तू पाहून चक्रावून गेला. 15 वर्षीय जॉर्ज टिंडेल हा त्याच्या ५२ वर्षीय वडील केविनसोबत ग्रँथम, लिंकनशायरजवळील विथम नदीत मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासेमारी व्यतिरिक्त तो मॅग्नेटिक फिशर देखील आहे. त्यामुळे नदीत चुंबक टाकून आतमध्ये असलेल्या रहस्यमय गोष्टी तो बाहेर काढत असत.
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी तो मासेमारी करत असताना अचानक त्याच्या चुंबकात जड वस्तू अडकली. यानंतर त्याने नदीतून दोरी बाहेर काढली तेव्हा त्याच्या चुंबकात तिजोरी अडकली होती. जेव्हा त्याने ते उघडले तेव्हा त्याचे होश उडाले. तिजोरीत एक लाखाहून अधिक रुपये सापडले आहेत. हे पाहून पिता-पुत्र दोघेही थक्क झाले.
संबंधित पैसे हे ऑस्ट्रेलियाच्या चलनात असून १.३ लाख रुपये होते. तसेच, तिजोरीच्या आत, त्यांना शॉट गन, प्रमाणपत्र आणि २००४ मध्ये कालबाह्य झालेले बँक कार्ड सापडले. हे कागदपत्र रॉब एव्हरेट नावाच्या व्यावसायिकाचे होते. त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली. वास्तविक २००० साली त्यांच्या कार्यालयात चोरी झाली होती आणि तिजोरी तेथून गायब झाली होती.
पिता-पुत्रांना तिजोरी सापडल्यानंतर त्यांनी ही तिजोरी त्वरित केली आहे. दरम्यान, विंकवर्थ आणि मनी ऑप्शन्स ग्रुपचे मालक रॉब एव्हरेट यांनी मुलगा जॉर्ज आणि वडील या दोघांचे खूप कौतुक केले आणि सांगितले की आजच्या काळातही जगात असे प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे. रॉबला जेव्हा समजले की जॉर्ज गणितात पारंगत आहे, तेव्हा तो जॉर्जला आश्वासन देतो की जेव्हा त्याला इंटर्नशिप किंवा नोकरीची आवश्यकता असेल तेव्हा तो त्याला त्याच्या वेल्थ मॅनेजमेंट कंपनीमध्ये त्याला काम देईल.