माशाशी पंगा घेणं मगरीला पडलं खूपच महागात, शिकारीसाठी पाण्यातून बाहेर पडताच मगरीचा तरफडून झाला मृ’त्यू …! पहा व्हिडीओ…

Entertainment

दुसऱ्यासाठी खड्डा खणताना आधी स्वतःलाच खड्ड्यात उतरावे लागते, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याच म्हणीचा प्रत्यय मगरीने केला आहे. मगर हा पाण्यातील सर्वात खतरनाक शिकारी म्हणूनओळखला जातो. तो घात लावून हल्ला करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मगर शांतपणे पाण्याच्या खाली निपचित पडून असते.

आणि एकदा काय शिकार टप्प्यात आली की मग वीजेच्या वेगाने हल्ला करून त्याचे दोन तुकडे करते. त्यामुळेच मगरीला पाण्यातील राक्षस असं देखील म्हटलं जातं. वन्यप्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील अनेक व्हिडिओ मगरींचेही आहेत. आपण मगरीला पाहिले तर आपल्याला अंगावर काटे उभे राहतात.

कारण मगर खूप धोकादायक असते. पाण्यात राहुल देखील तिची ताकद खूप असते. पाण्यातील मगरी अगदी सिंहाचीही शिकार करता येईल इतक्या ताकदवान असतात. आता एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका लहान माशाने एका धोकादायक मगरीचा जीव घेतला. माशांची शिकार करण्याच्या नादात मगरीचाच बळी गेला.

मगरीला माशांची शिकार पडली महागात एका तलावाच्या काठावर पाण्यात एक मगर पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. जवळच एक ईल मासाही आहे. असे दिसते की ईल पाण्यातून बाहेर पडू इच्छित आहे. तेव्हा मगरीने त्याच्यावर हल्ला करून त्याला जबड्यात पकडले. दरम्यान, असे करणे तिच्यासाठी खूप महागात पडले आहे. मगरीने तो ईल मासा आपल्या जबड्यात पकडताच तिला करंटचा धक्का बसतो.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मगरीचे संपूर्ण शरीर थरथरू लागले आहे. विजेचा शॉक लागल्याने महाकाय मगरीचा पाण्यात असहाय्यपणे छळ सुरू होतो. या दरम्यान, तिच्या जबड्यात ईल देखील अडकून राहते, ज्यामुळे दोघेही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. काही काळ त्रास सहन केल्यानंतर मगरीचे शरीर ताठ होते आणि शांत होते.

मगरीला ईल माशाचा सुमारे 860 व्होल्टचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे मगरीचा वेदनेने मृत्यू होतो, तर ईल मासाही मगरीच्या जबड्यात अडकल्याने मृत्यूमुखी पडतो. शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने ही संपूर्ण घटना आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद केली. ईल मासा हा मगरीचा सोपा शिकार मानला जात होता, मात्र, मगरीला शिकार करणे महागात पडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *