बाप रे! दुचाकी चालवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला दिली म्हशीने धडक, पहा थेट शिंगांवरच घेऊन…! व्हिडीओ व्हायरल…

Entertainment

म्हैस हा ‘सस्तन प्राणी’ आहे. जो सामान्यतः काळ्या रंगाचा असून घरांमध्ये पाळला जातो. हा पाळीव प्राणी असून त्याचा उपयोग दुधासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, हा शांत स्वभावाचा प्राणी जर कधी आक्रमक झाला तर मात्र, याला नियंत्रणात आणण्यासाठी फार कष्ट करावे लागते. अनेकदा आक्रमक झालेली म्हैस नियंत्रणात आली नाहीतर त्याला गोळीदेखील मारून त्याची हत्या केली जाते.

जनावरांना राग येतो आणि रागाच्या भरात आक्रमक झालेला हा प्राणी वाटेत येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांवर हल्ला करत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्याला पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एका म्हशीने दुचाकीवरून जाणाऱ्या पोलिसावर हल्ला केला आहे. त्यानंतर काय झाले ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता.

संबंधित व्हिडिओ हा दीड वर्षांपूर्वी ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. जो पियुष राय नावाच्या युजरने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला होता. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातून एक भटकी म्हैस पोलीस ठाण्यात घुसली. त्यानंतर ती म्हैस पोलिस ठाण्यात इकडे-तिकडे फिरू लागली. दरम्यान, यावेळी दुचाकीवरून एक पोलिस कर्मचारी रस्त्याने चालला होता.

म्हशीला रस्त्यावर थांबलेले पाहून कर्मचाऱ्याने हॉर्न वाजवला. पोलिस कर्मचाऱ्याला बाईक चालवताना पाहून म्हशीला राग आला आणि म्हशीने कर्मचाऱ्याच्या दुचाकीस धडक दिली आहे. यानंतर, कर्मचारी दुचाकीसह खाली पडला. मात्र, आक्रमक झालेली म्हैसने कर्मचाऱ्यास शिंगावर उचलून लांबवर फरफटत नेले. यावेळी आजुबाजुस असलेल्या व्यक्तींनी धाव घेत त्या म्हशीला मारण्यासाठी गेले असता त्या म्हशीने तेथून पळ काढला.

त्यामुळे कर्मचाऱ्याचा जीव वाचला अन्यथा त्या म्हशीने पोलीस कर्मचाऱ्याचा जीव घेतला असता. दरम्यान, ही घटना उत्तरप्रदेश राज्यामध्ये घडली असून संबंधित व्हिडिओ हा पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेतील आक्रमक झालेली म्हैस काही काळानंतर नियंत्रणात आली आहे. तसेच, ही म्हैस सुखरूप त्याच्या मालकाकडे सोपवण्यात आली आहे.

अनेकजण हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून थक्क झाले असून वेगवेगळे प्रश्न कमेंट्सच्या माध्यमातून विचारत आहेत. वेळेवर धाऊन गेलेल्या आजूबाजूच्या पोलिसांचे अनेकजण कौतुक करत आहेत. तसेच, या व्हिडिओला लाईक्सदेखील मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *