प्रेग्नंन्ट होता होता मृत्यूच्या दारापर्यंत पोहचली ही मांजर, पहा पैशासाठी मांजराकडून 70 पिलांचा करून घेतला जन्म…! अन मग…

Entertainment

माणसाच्या मनात लोभ हळूहळू वाढत आहे. आजच्या काळात माणूस आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशासाठी काहीही करायला तयार असतो. पण पैसे कमावण्यासाठी माणुसकी विसरणारे अनेक लोक आहेत. पैशासाठी राक्षस बनलेल्या अशाच काही लोकांच्या बातम्या आपण सोशल मीडियावर वाचल्याच असतील.

महागड्या जातीच्या मांजरांची पिल्ले विकून पैसे कमावण्याच्या नादात या लोभी लोकांनी दोन मांजरींपासून सुमारे सत्तर पिल्ले जन्माला घातली. यामुळे दोन्ही मांजरी मृत्यूच्या तोंडावर जाऊन पोहोचल्या. केस नसलेली स्फिंक्स मांजर ही सर्वात महाग मांजरी मानली जाते. लँकेशायर, यूके येथील मांजर अभयारण्य कामगारांनी दोन स्फिंक्स मांजरींची त्यांच्या मालकांकडून सुटका केली.

पैसे कमावण्यासाठी या मांजरींचे मालक जबरदस्तीने त्यांची पैदास करायचे. पिल्लांना जन्म देताना दोघीही मृ’त्यूच्या तोंडावर जाऊन पोहोचल्या होत्या. त्यांना एक प्रजनन यंत्र म्हणून वापरले जात होते. INS च्या मालकाने सत्तर मांजरी पासून पिल्लांची निर्मिती करून सुमारे एक कोटी 35 लाख रुपये कमावले होते. आता त्यांच्यापासून या मांजरांची सुटका करण्यात आली असून त्यांच्या घराचा शोध सुरू आहे.

एक पिल्लू लाखात विकायचे :- बचाव पथकाने सांगितले की, 11 वर्षांच्या केइकोपासून आतापर्यंत सत्तर पीलांचा जन्म झाला आहे. प्रत्येक पिल्लाची सुमारे दोन लाखांना विक्री करण्यात आली. केइकोला तिचाच स्वतःचा नऊ वर्षांचा मुलगा निम सोबत प्रजनन करण्यात आले.

गेल्या आठवड्यात दोघांची सुटका करण्यात आली आणि ब्लॅकपूलला पाठवण्यात आले, जिथे दोघांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. दोघांनाही फेलाइन कॅलिसिव्हिरसची लागण झाल्याचे आढळून आले. या विषाणूच्या पकडीमुळे दोघांही मांजरांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच त्याच्या हिरड्यांना संसर्ग झाला होता.

अशी होती स्थिती :- सत्तर पिल्ले झाल्यावर केइकोच्या पोटाची त्वचा तिच्या पाठीपर्यंत दुमडण्याइतकी सैल झाली. त्याचवेळी निमच्या तोंडात खूप संसर्ग झाला होता, त्यामुळे त्याचे सर्व दात काढावे लागले होते. एवढेच नाही तर त्याच्या किडनीमध्ये इन्फेक्शनही आढळून आले. दोघांच्या उपचारासाठी सुमारे दोन लाखांचा खर्च झाला. त्याची अवस्था पाहून रेस्क्यू टीम अचंबित झाली. आता त्यांचे स्वत:साठी नवीन घर शोधत आहे, जिथे त्यांना शांततापूर्ण जीवन मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *