हिवाळ्यात लोक दिवसभर बर्याच वेळा चहा किंवा कॉफी पितात. पण गॅस आणि अपचनच्या समस्येमध्येही चहा आणि कॉफी पिणे फायदेशीर आहे का? खरं तर हिवाळ्यात लोक वेगवेगळ्या प्रकारचे तळलेले भाजलेले पदार्थ खातात, ज्यामुळे ऍसिडिटी आणि गॅसची समस्या उद्भवतात .
कधीकधी, या ऍसिडिटीमुळे ओटीपोटात वेदना, छातीत घट्टपणा किंवा तीव्र डोकेदुखी देखील होते. पण लोकांना चहा पिल्याने गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो का? तर अशात चहा पिणे अधिक फायदेशीर आहे की कॉफी? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याआधी, प्रथम चहा आणि कॉफी हे भरपूर प्रमाणात पिण्याबद्दल संशोधक काय म्हणतात ते जाणून घेऊया. मग आपणास समजेल की या दोनपैकी नक्की काय सहजपणे गॅस ट्रिगर करू शकते.
गॅसच्या समस्येमध्ये चहा आणि कॉफी पिण्याबद्दल २०१३ मध्ये झालेल्या संशोधनानुसार, कॉफी आणि चहा सारख्या खाद्यपदार्थांमुळे GERD (गॅस्ट्रोजेफॅगेअल रिफ्लक्स रोग)ची लक्षणे बिघडू शकतात. यामुळे लोकांना भूक कमी लागते, ढेकर येतात, छाती आणि पोटात जळजळ होते. डॉक्टर आणि आरोग्य संघटनांनी अशी शिफारसही केली आहे की GERD ची लक्षणे असलेल्या रुग्णांनी कॅफिनयुक्त पेये टाळावीत. तसेच GERD असलेल्या काही लोकांच्या अहवालात असे दिसून आले आहे की जास्त प्रमाणात कॅफिनयुक्त पेय पदार्थांचे सेवन केल्याने गॅस आणि ऍसिडिटीच्या लक्षणांवर परिणाम होऊ शकतो.
गॅसच्या समस्येमध्ये कॉफी : गॅस्ट्रोएंटेरोलॉजी अँड हेपेटोलॉजी जर्नलच्या मुलाखतीत स्टॅनफोर्ड विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक लॉरेन बी. गर्सन यांनी GERDच्या रूग्णांच्या जीवनशैलीतील बदलांविषयी बोलताना कॅफिन टाळण्याचे सुचविले. गर्सन म्हणतात की GERD असलेल्या व्यक्तींनी कॅफिनयुक्त पेय पदार्थांसह, त्याचे लक्षणे वाढविणारे पदार्थ आणि पेय पदार्थांचे सेवन करणे टाळावे. आपण कॉफी पित असाल, ज्यात जास्त प्रमाणात कॅफिन आहे, तर यामुळे गॅसची समस्या देखील उद्भवू शकते किंवा ती वाढू शकते.
गॅसमध्ये चहा पिण्याचे फायदे : आता चहा आणि गॅसच्या समस्येबद्दल बोलूयात, संशोधक म्हणतात की कॅफिन चहात असो कॉफीत असो किंवा मग इतर कोणत्याही पदार्थात. हे कॅफिनयुक्त सगळे पदार्थ गॅसची समस्या वाढवू शकतात. चहामध्ये केवळ कॅफिनच नाही तर इतरही अनेक घटक असतात. जर आपण चहात या पदार्थांसह बदल केले तर आपल्यासाठी चहा गॅसच्या समस्येमध्ये देखील निरोगी असू शकतो. उदाहरणार्थ, चहामध्ये जास्त दूध आणि चहा पावडर टाकू नका. त्याऐवजी चहाचे सर्वोत्तम पर्याय निवडा. जसे की…
– लिंबु घातलेला चहा
– दुधाशिवाय काळा चहा
– ग्रीन टी
– गवतीपानांचा चहा
– रोझमेरी टी
तथापि गॅसच्या त्रासात चहा आणि कॉफी पिण्याबद्दल अजून बरेच संशोधन करणे आवश्यक आहे. हे यासाठी कारण बर्याच संशोधनात असे देखील दिसून आले आहे की आहारातून कॅफिन पूर्णपणे काढून टाकणे शहाणपण नाही. कारण कॅफिन मेंदू सक्रिय करण्यासाठी देखील कार्य करते. तसेच शरीरासाठी कॉफीचे इतरही बरेच फायदे आहेत.
परंतु तरीही लोकांनी नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की जर आपण त्यांचे सेवन संतुलित पद्धतीने केले नाही तर समस्या उद्भवू शकतात. जर एखाद्या व्यक्तीस असे आढळले की कॅफिनमुळे त्यांचात गॅस आणि अपचनाची लक्षणे वाढता आहेत, तर ते कॉफी आणि कॅफिन असलेला चहा प्यायचे थांबवू किंवा कमी करू शकतात. त्याऐवजी अशा लोकांनी हर्बल किंवा फळांचा चहा इत्यादी घ्यायला हवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे.live64media याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.