पायांच्या टाचा फाटलेल्या आहेत?; ‘ही’ क्रीम बनवा घरच्या घरीचं! टाचा होतील एकदम कोमल….

Health Tips Uncategorized

हिवाळा सुरू झाला की आपल्या त्वचेचा ओलावा देखील कमी होणे सुरू होतो. ज्यामुळे टाच कडक व्हायला लागतात. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना महिला जास्तकरून त्यांच्या चेहरा आणि हात व पाय यांकडे जास्त लक्ष देतात. परंतु फाटलेल्या टाचांमुळे पायांचे सौंदर्य कमी होते, शिवाय बरेचदा त्याने वेदना देखील होतात. टाचा फाटण्यापासून वाचवण्यासाठी हिवाळ्यात आपण जितके शक्य असेल  तितके सॉक्स घालणे चांगले आहे . या व्यतिरिक्त आज आम्ही तुम्हाला फाटलेल्या टाचांपासून वाचण्यासाठीचे उपाय सांगणार आहोत जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.

घरी पेडीक्योर करा : जर आपण आपल्या पायांची चांगली काळजी घेतली तर मग आपल्या टाचा फाटण्याची समस्या कधी उद्भवणार नाही. यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे हायड्रोजन पेरोक्साईड, शॅम्पू, डेटॉल टाका. मग त्यात आपले पाय ठेवा आणि चांगले स्क्रब करा. जर टाचा फाटल्या असल्यास फूट स्क्रबरबरला दाबून घासू नका. आपली इच्छा असल्यास, कोरडे झाल्यावर देखील पाय स्क्रब करा. यानंतर बॉडी स्क्रबने पाय स्वच्छ करा.

आपण घरी फूट क्रीम बनवून देखील वापरू शकता.

साहित्य

खोबरेल तेल – २ मोठे चमचे
कोरफड जेल – २ चमचे
एसेंशियल ऑयल – ४ थेंब
मेणबत्ती मेण किंवा बी-व्हॅक्स

बनवण्याची कृती : कोरफड जेलमध्ये एसेंशियल ऑयल घाला, ते चांगले मिक्स करून आणि बाजूला ठेवा. आता दुसरं एक भांड घ्या आणि त्यात मेणबत्तीचा मेण आणि खोबरेल तेल घालून ते गरम करा. आता हे मिश्रण एसेंशियल ऑयल सोबत एलोवेरा जेलमध्ये मिसळा. हे चांगले मिसळल्यानंतर क्रीम एअरटाईट बॉक्समध्ये ठेवा. आता या क्रीमने झोपायच्या आधी पाय स्क्रब करा. आपल्याला हवे असल्यास क्रीम लावून आपण सॉक्स घालू शकता.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे.Live64media याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *