बॉलिवूडचा गॉडफादर सलमान खानचा सुपरहिट चित्रपट ‘तेरे नाम’ने तर लोकप्रियता मिळवलीच शिवाय त्याची हेअरस्टाइलही खूप गाजली. या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका करणारी अभिनेत्री भूमिका चावला देखील या चित्रपटाच्या यशामुळे रातोरात स्टार बनली. या चित्रपटात एक वेडी मुलगी सुद्धा होती, जीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
चित्रपटात जरी हीने वेड्या मुलीची भूमिका पार पाडली असली तरीही खऱ्या आयुष्यात मात्र खूपच सुंदर आणि हुशार आहे. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव रौशनी चौधरी असे आहे. या अभिनेत्रीने त्यावेळी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. तिच्या या भूमिकेमुळे तिला आजही लोक स्मरणात ठेऊन आहेत.
तेरे नाम चित्रपटाच्या एका दृश्यात राधे भाई म्हणजेच सलमान खान एका वेड्या मुलीला चहा प्यायला देतो तेव्हा आणि गुंड जेव्हा छेडछाड करतात तेव्हा त्यांना चांगलाच धका शिकवतो…! तुम्हाला ती वेडी मुलगी आठवते का? रोशनीने वेड्या मुलीची भूमिका साकारली होती ती भूमिका प्रेक्षकांना वेड लावून गेली होती.
या भूमिकेने तिला विशेष ओळख मिळवून दिली होती. म्हणून तर आजही “तेरे नाम” चित्रपट पाहताना तिची भूमिका आवर्जून पाहिली जाते. पण पडद्यावर वेडी दिसलेली रौशनी खऱ्या आयुष्यात खुप छान आहे. रोशनीने बॉलिवूडमध्ये ३० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या सर्व चित्रपटांतील रोशनीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकही झाले.
रोशनी कोणत्याही अभिनेत्रीइतकी लोकप्रिय झाली नसली तरी बॉलिवूडमधील मोठे स्टार्सही तिला ओळखतात. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. तुम्हाला माहित नसेल की रोशनी चौधरी देखील दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रोशनीने हिंदीसह अनेक तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.
‘तेरे नाम’ आणि ‘खुशी’ सारखे चित्रपट करणारी रोशनी 2004 नंतर अचानक चित्रपटाच्या पडद्यावरून गायब झाली. वास्तविक, रोशनीला चित्रपटांमध्ये अभिनेत्रीच्या भूमिकेत फारसा प्रतिसाद मिळाला नाही. रोशनी चौधरी विषयी बोलायचं झालं, तर यानंतर पडद्यावर काम करण्याऐवजी रोशनीने पडद्यामागे राहून दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली.
आणि एका उत्तम दिग्दर्शकाचे बारकावे शिकायला सुरुवात केली. तिने १७ मिनिटांच्या ‘ऑरेंज ब्लॉसम’ या शॉर्ट फिल्मद्वारे दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केले होते. तर ही फिल्म अवघ्या ४ दिवसांत बनली होती. ही. शाॅट फिल्म पतीपासून विभक्त झाल्यानंतर जगणाऱ्या एकल आईची कथा सांगते.