बर्याच वेळा चेहऱ्यावर काळा किंवा तपकिरी म्हणजेच हलका ब्राऊन रंगाचा ठिपका दिसून येतो. काहीजण याला तिली म्हणतात तर काही म्हणतात तिळ. हे बर्याचदा सूर्यप्रकाशाच्या किंवा प्रदूषणाच्या वातावरणात प्रदीर्घ राहिल्यामुळे होते. चेहऱ्यावरील या तीळमुळे तुम्ही देखील त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने तुम्हाला या चेहऱ्याच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकेल.
सर्व प्रथम, चेहर्यावरील काळ्या डागांबद्दल बोलू. जास्त काळ धूळ मातीत राहणे किंवा तेलकट जेवण घेतल्याने चेहर्यावर मुरुमांची समस्या उद्भवते, कधी कधी या मुरुमांमुळे चेहर्यावर काळे डाग देखील पडायला लागतात. अशा परिस्थितीत बटाट्याचा तुकडा किसून घ्या, त्यानंतर त्याचा रस काढा आणि तो चेहऱ्यावर लावा. २० ते २५ मिनिटे बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावून ठेवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने १ ते २ महिन्यांत चेहऱ्यावरील सर्व डाग दूर होतील.
दुसरा उपाय – लसूण
लसूणच्या कळ्या बारीक बारीक वाटून घ्या आणि त्यांची पेस्ट तयार करा. या पेस्टला फक्त जिथं मुरुम आहेत तेवढ्याच जागेवर १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. असे केल्याने मुरुमांचा त्रास लवकरच दूर होऊन जाईल तसेच मुरुमांमुळे चेहऱ्यावर पडलेले डागही दूर होतील.
तिसरा उपाय – पुदिना आणि कोथिंबीर
कोथिंबीर आणि पुदीना बारीक करून पाण्यात मिसळा आणि पेस्ट बनवा. दोन्हीचे पाने काळजीपूर्वक चांगले धुवून घ्या. त्यानंतर दोन्ही गोष्टींची पेस्ट बनवा. एकत्र वाटून घेतल्यानंतर चेहरा स्वच्छ करा आणि पेस्ट चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट ताजी ताजीच चेहर्यावर लावण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला ती पेस्ट साठवून ठेवायची असेल तर आपण ती सकाळी बनवू शकता आणि जास्तीत जास्त संध्याकाळीपर्यंत वापरू शकता.
तर चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्यापासून मुक्त होण्याचे हे घरगुती उपाय होते. आपल्या आहाराची नेहमीच काळजी घेण्याचा प्रयत्न करा. सकस आणि पौष्टिक खा, जेणेकरून चेहऱ्यावर कोणतेही डाग धब्बे किंवा फ्रीकल दिसणार नाहीत.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Live64media याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.