चाणक्‍यच्या मते लग्न करण्यापूर्वी पति-पत्नीने नक्की बघितले पाहिजे हे पाच गुण…

Tips

कौटिल्य या नावाने ओळखल्या जाणार्‍या भारतीय इतिहासातील प्रसिद्ध कुटनिती तज्ञ चाणक्य हे  केवळ राजनीती आणि शासनबद्द्लच्या  त्यांच्या विचारांसाठीच नव्हे तर घरगुती जीवनात नवीन कल्पना मांडण्यासाठी  देखील ओळखले जातात.

महत्त्वाचे म्हणजे चंद्रगुप्त मौर्य यांना भारताचा सम्राट बनविण्यात चाणक्य यांची सर्वात महत्वाची भूमिका होती. आजही एक दंतकथा प्रसिद्ध आहे की जर कोणाकडे चाणक्य सारखा सल्लागार असेल तर तो हारून देखील जिंकतो आणि तो इतिहास रचतो.

चाणक्य यांनी राजनीती बद्दल जेवढे ज्ञान दिले आहे तेवढेच त्यांनी स्त्रियांबद्दलही बरेच काही सांगितले आहे. त्यांनी आपल्या भावी पत्नीमध्ये इच्छित असलेल्या स्त्रियांच्या विशेष गुणांबद्दल सांगितले आहे. महिलांचे चांगले गुण काय आहेत याबद्दल सविस्तरपणे आपण जाणून घेऊया.

चाणक्य म्हणतात की महिलांचे बाहेरील सौंदर्य नगण्य आस्ते. त्यांच्या मते स्त्री सुंदर असणे ही एक परिपूर्ण गोष्ट नसते.  ते म्हणतात की जो कोणी पुरुष फक्त स्त्रीचे सौंदर्य पाहून तिच्याशी लग्न करतो त्याला भविष्यातील मोठ्या संकटाना उत्तर द्यावे लागते. लग्नाआधी पुरुषांनी फक्त महिलांच्या सौंदर्यावर लक्ष देऊ नये कारण सौंदर्य हे जास्त काळ टिकत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनातील सौंदर्य होय.

एखाद्याने नेहमीच स्त्रीच्या अंतर्गत सौंदर्याचा विचार केला पाहिजे. हीच गोष्ट पुरुषांमध्येही लागू होते. स्त्रियांना देखील पुरुषाच्या बाह्य सौंदर्याने मोह नसावे आणि त्याच्या अंतर्गत गुणांकडे पाहिले पाहिजे.

आपल्या जोडीदारामध्ये ही गुणवत्ता असणे महत्वाचे आहे:- चाणक्य म्हणतात की लग्नाच्या वेळी पुरुषाने स्त्रीच्या संस्काराचे सौंदर्य तपासू बघावे. बाहेरील सौंदर्य हे अस्थिर आहे. ते कधीही संपले जाऊ शकते. चांगली मूल्ये बर्‍याच वेळा कामी पडतात. जी स्त्री आपल्या पतीचा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांचा आदर करते त्या घराला अशी स्त्री नंदनवन बनवते.

स्त्रीची ही गुणवत्ता येणाऱ्या पिढीसाठी चांगल्या गुणांचा पाया रचते. हीच गोष्ट पुरुषांमध्येही असली पाहिजे. लग्नाआधी मुलीचे व मुलीने मुलाचे संस्कार समजून घेतले पाहिजेत. केवळ स्त्रियांच्या चांगल्या संस्काराने कोणत्याही कुटुंबाचे कल्याण होऊ शकत नाही. घरातील पुरुष मंडळी देखील तेवढेच महत्वाचे असतात.

 राग हा सर्वात मोठा शत्रू आहे :- चाणक्य यांनी रागाला मनुष्य जातीचा सर्वात मोठा शत्रू म्हणले आहे. चाणक्य असे म्हणतात की जो माणूस आपल्या रागावर मात करतो त्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळविला आहे. रागामुळे माणूस खूप काही हारतो. कौटुंबिक जीवनात राग हा एका विषारी सापासारखा असतो जो कुटूंबाच्या सर्व आनंदात विष पसरवतो.

वैवाहिक जीवनात पती-पत्नीचा स्वभाव एकमेकांपेक्षा खूपच वेगळा असेल तर त्या कुटुंबात सर्वकाळ संकटे येत राहतील. जर स्त्री अति राग राग करणारी असेल तर ती पूर्ण कुटुंब नष्ट करू शकते.

 सन्माननीय जीवनासाठी हा गुण असणे आवश्यक आहे :- जेव्हा आपण लग्न करता तेव्हा सर्वात आधी आपल्या जोडीदाराच्या धर्माबद्दलचे विचार जाणून घ्या. जोडीदाराचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे की नाही यावर विश्वास आहे कारण या सर्व गोष्टी त्याला सभ्य बनवतात आणि चांगल्या कर्मांचे अनुसरण करण्यास प्रवृत्त करतात. ज्याला धर्मावर विश्वास नाही तो माणूस मनमानी करतो. म्हणूनच सुखी वैवाहिक जीवन आणि कुटुंबाची सुव्यवस्था चालू ठेवण्यासाठी धर्मावर विश्वास असणे फार आवश्यक आहे.

 चाणक्य म्हणतात की संयम सर्वात महत्वाचा आहे :- सुखी वैवाहिक जीवनासाठी पती पत्नीमध्ये संयम असणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा स्त्री आणि पुरुषात संयम असतो तेव्हा जीवनातील सर्वात कठीण काळातही त्यांचे नाते आनंदी राहत  असते.

आपल्या ध र्म ग्रंथात स्त्रीला शक्ती म्हणतात तर पुरुषला बल म्हणतात. जरी देवांमध्ये  महादेव सर्वात शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते तरी पार्वती ही शक्तीची देवी मानली जाते आणि पार्वती यांनाही शिवशक्ती मानली जाते. एक स्त्री जी सहनशील आहे ती आपल्या पतीस कोणत्याही अडचणींमधून बाहेर काढू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *