अशा काही वाईट गोष्टी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधीतरी घडत असतातच ज्यामुळे त्यांच्या मनात त्या गोष्टीची एक आठवण कायम राहते. कोणीही हे कधीही विसरत नाही आणि हे फक्त सामान्य लोकांमध्येच नाही तर चित्रपटातील कलाकारांसमवेत देखील घडते.
अशी एक गोष्ट चित्रपटात अनेकदा खास भूमिका साकारणारी अभिनेत्री परिणीती चोप्राच्या बाबतीतही घडली आहे ती आजही त्या गोष्टीना आठवते. प्रियंका चोप्राची बहीण असणाऱ्या परिणती चोप्रा देखील तिच्या आयुष्यातील सर्वात वा-ईट टप्प्यातून गेली होती.
प्रियंका चोप्राची बहीण आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यात गेली आहे:- बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा अखेरचा चित्रपट जबरीया जोडी मागच्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला होता. दरम्यान परिणीतीने तिच्या एका मुलाखतीत काही गोष्टी नमूद केल्या.
तिने सांगितले की तिच्या चित्रपट कारकिर्दीत ती खूपच वाईट अवस्थेत गेली होती आणि परिणीती चोप्रासाठी ती एक अशी वेळ होती जेव्हा तिच्याकडे पैशाची कमतरता होती आणि संपूर्ण वेळ घरीच राहावे लागत असे. परिणीती चोप्रासुद्धा त्या दिवसांत 6 महिने माध्यमांसमोर नव्हती.
लेडीज बनाम रिकी बहल या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारी परिणीती चोप्रा म्हणाली की २०१५ मध्ये तिचा सर्वात वाईट काळ आला जेव्हा तिचा दावत-ए-इश्क या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी केली. परिणीती चोप्राच्या म्हणण्यानुसार तिच्याकडे अजिबात पैसे शिल्लक नव्हते आणि त्यावेळी तीने नवीन घर नुकतेच खरेदी केले होते. परिणीती म्हणाली फिल्म फ्लॉपचा ताण आणि पैशे संपल्याचा ता णही वरून नवीन घर घेतल्याचा तिच्यावर खूप ता ण होता.
तो काळ माझ्यासाठी खूप वाईट होता. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट खाली जात होती आणि पुढे जाण्यासाठी मला माझ्या आयुष्यात काहीही सकारात्मक दिसले नाही. ”परिणीती पुढे म्हणाली,“ त्या वेळी मी खाणे बंद केले आणि संपूर्ण वेळ घरी बेड वर झोपून काढत असे. त्यावेळी माझे कोणतेही मित्र नव्हते व मी माझ्या कुटूंबाशीही संपर्क साधू शकले नाही.
त्या काळात मी दोन आठवडे कोणाशीही बोलले नाही आणि मी फक्त माझ्या खोलीतच राहून टीव्ही पाहयचेआणि झोपायचे. मी जवळजवळ ६ महिन्यांपर्यंत नै-राश्यात गेले होते आणि मला मीडियाला सामोरे जावे लागले नाही.
याविषयी पुढे बोलताना परिणीती म्हणाली माझा भाऊ सहज आणि माझी मैत्रीण संजना त्यावेळी मला खूप साथ देणारी होती. मी दिवसातून खूप वेळा रडत असे आणि नि-राश होऊ लागले होते. पण सन 2016 पासून माझी परिस्थिती बदलू लागली होती आणि मी स्वत: वर काम केले आणि त्याच वेळी गोलमाल -4 चित्रपट मिळाला त्याचबरोबर प्यारी बिंदू चित्रपट देखील मी साईन केला.
परिणीतीने इशाकजादे केसरी हंसी तो फसी या चित्रपटांत काम केले आहे. याशिवाय परिणीती सायना नेहवालच्या बायोपिकमध्येही सध्या काम करत आहे. हल्ली बायोपिकची क्रेझ आहे.
त्यातूनही खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो. सध्या अभिनेत्री परिणीती चोप्रा एका बायोपिकमध्ये काम करतेय. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटू सायना नेहवालची भूमिका साकारतेय. या चित्रपटासाठी ती खूप मेहनत घेतेय.
या चित्रपटात आधी श्रद्धा कपूर काम करत होती. या चित्रपटासाठी श्रद्धानेही बॅडमिंटन को-र्टवर जाऊन खूप सराव केला होता. पण नंतर व्यस्त वेळापत्रकामुळे या चित्रपटात ती काम करू शकली नाही. आता तीच भूमिका परिणीती साकारत आहे.