नमस्कार मित्रांनो, बर्याच वेळा घरातील एखादी व्यक्ती जेवली नाही तर किंवा इतर काही कारणाने चपात्या शिल्लक राहतात. परंतु अनेक लोकांना घरात शिल्लक राहिलेल्या शिळ्या चपात्या खायला आवडत नाही. अशा परिस्थितीत या उरलेल्या चपात्यांचे काय करावे? याचे घरात स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला टेंशन येते.
तेव्हा अशात काही स्त्रिया अन्न वाया जायला नको म्हणून त्या चपात्या एकतर गाय किंवा जनावरांना खायला देतात किंवा मग फेकून द्यायला लागतात. तसे तर शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून बऱ्याच प्रकारचे व्यंजन बनवू शकतो. परंतु आज आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेल्या चपात्याचा उपमा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.
आवश्यक साहित्य :
शिळ्या चपात्या – ४
हिरवी मिरची – २ (बारीक चिरून)
कांदा – १ (बारीक चिरलेला)
टोमॅटो – १ (बारीक चिरून)
कॅप्सिकम – लहान आकार (बारीक चिरून)
वाटाणे – अर्धा कप
राई – अर्धा चमचा
शेंगदाणे – १ मोठा चमचा (भाजलेले)
लाल तिखट – अर्धा छोटा चमचा
धणे पावडर – १ छोटा चमचा
लिंबाचा रस – १ छोटा चमचा
मीठ – चवीनुसार
तेल – २ चमचे
धणे – गार्निशिंगसाठी
कृती : प्रथम सर्व चपात्यांचे लहान लहान तुकडे करुन घ्या. आता कढईत तेल टाकून गरम होऊ द्या आणि त्यात मोहरी घाला. मोहरीच्या दाण्यांचा तडका झाल्यावर त्यात हिरवी मिरची आणि कांदा घाला आणि कांदा सोनेरी होईपर्यंत मध्यम आचेवर फ्राय करा. आता त्यात कॅप्सिकम आणि वाटणे घाला, 2 मिनिटे शिजवा आणि नंतर टोमॅटो घाला आणि फ्राय करा.
नंतर धणे पूड, लाल तिखट आणि शेंगदाणे घाला आणि १ मिनिट शिजवा. सर्व मसाले भाजल्यानंतर त्यात चपात्यांचे तुकडे आणि मीठ घाला आणि चांगले ढवळत असताना २ मिनिटे शिजवा. शिळ्या चपात्यांपासून बनवलेला उपमा रेसिपी तयार आहे. आता गॅस बंद करा आणि उपमा एका भांड्यात काढा आणि कोथिंबीरने सजवा आणि गरम गरम सर्व्ह करा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे.Live64media याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.