आता तुम्ही जायफळचे हेअर मास्क वापरून देखील केसांना बनवू शकता कोकिळा पेक्षाही चमकदार …

Interesting Tips Uncategorized

जायफळ हे आपल्या आरोग्यासोबत केसांसाठी देखील फायदेशीर आहे. चला ते जाणून घेऊ त्याचा वापर आणि केसांसाठी होणाऱ्या फायद्यांबद्दल. जायफळ सामान्यतः गरम मसाला म्हणून वापरले जाते. पण जायफळ हा असा मसाला आहे की आरोग्याबरोबरच आपली त्वचा आणि केसांचे सौंदर्यही वाढवते.

एकीकडे, जायफळ त्वचेचे डाग आणि मुरुम बरे करण्यास मदत करते. त्याचबरोबर हे केसांच्या अनेक समस्यांपासून मुक्त करून केसांना सौंदर्य देखील प्रदान करते. जर आपल्याला देखील नैसर्गिकरित्या आपले सौंदर्य वाढवायचे असेल तर आपण जायफळचा वापर केला पाहिजे. जायफळमध्ये असलेले पोषकतत्व स्कॅल्प निरोगी ठेवण्यासाठी आणि केसातील कोंडा दूर करण्यास मदत करतात. चला तर जायफळाचा वापर करुन केस कसे सुंदर बनवता येतात ते जाणून घेऊया.

चमकदार केसांसाठी: चमकदार आणि मजबूत केसांसाठी आपल्या आवडत्या शैम्पू आणि कंडिशनरमध्ये १ चमचा जायफळ पावडर घाला आणि नंतर त्याने केस धुवा. लवकरच, आपले केस चमकू लागतील, तसेच केसांना मजबुती देखील प्राप्त होईल.

कोंडा कमी करण्यासाठी: आपण आपल्या केसांच्या मास्कमध्ये जायफळ तेल देखील मिसळू शकता. हे केवळ छिद्रांना ओलावा टिकवून ठेवण्यासच मदत करत नाही तर एक अँटिसेप्टिक म्हणून देखील कार्य करते ज्यामुळे डोक्यातील कोंडा आणि बॅक्टेरिया यांना प्रतिबंधित करता येते.

केस दाट करत: जायफळ तेल केसांना मजबूत आणि चमकदार बनविण्यात मदत करू शकते, हे केस गळतीस प्रतिबंधित करते, केसांच्या वाढीस उत्तेजन देऊ शकते आणि केसांची मजबुती देखील वाढवू शकते. यासाठी आपल्या स्कॅल्पवर जायफळ तेलाचे काही थेंब टाकून चांगली मालिश करा.

केसांच्या वाढीसाठी जायफळापासून बनवलेल्या मास्कने केसांचे सौंदर्य वाढवा आवश्यक साहित्य :- 

जायफळ पावडर – 1 टीस्पून
दही – 1 टीस्पून
मध – 1 टेस्पून

बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत :-  केसांचा मास्क तयार करण्यासाठी, सर्व साहित्य एका वाटीत घेऊन ते चांगले एकजीव करून घ्या. केसांच्या मुळांना तयार केलेली पेस्ट लावून मालिश करा. मास्क पूर्णपणे केसांवर लावल्यानंतर केसांना शॉवर कॅपने झाकून ठेवा. सुमारे अर्धा तासांनंतर केसांना केस धुवा. फार लवकरच आपल्याला केसांवर परिणाम दिसू लागेल.

स्कॅल्प उपचार मास्क आवश्यक साहित्य :- 

ऑलिव्ह तेल – 3 चमचे
मेहंदी – 1 चमचे
जायफळ पावडर – 1 चमचे

बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत :- एका वाटीत सर्व साहित्य घेऊन एकत्र करून मिक्स करावे. केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत चांगले लावा. नंतर शॉवर कॅपने केस झाकून ठेवा. अर्ध्या तासानंतर केसांना सौम्य शैम्पूने धुवा. 15 दिवसांत एकदा हे हेअर मास्क वापरुन केसांचे सौंदर्य वाढते.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Live64media याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *