आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नं ही एक परंपरा आहे. आणि लग्न झालेल्या जोडप्याला विचारला जाणारा पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला किती मुलं आहेत? या प्रश्नाचे उत्तर देताना आपण पाहतो अनेकदा तरूण पिढीची गडबड होऊन जाते. मात्र, सध्या एक धक्कादायक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केनिया येथिल गावात चक्क फक्त आणि फक्त स्त्रीयांनाच राहण्याची मुभा दिली जाते. या गावात पुरूषांना येणार मनाई आहे. केनियातील संबुरू येथील उमोजा गावात पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे, त्यामुळे या गावात एकही पुरुष राहत नाही. गेल्या 27 वर्षांपासून या गावात पुरुष येत नसतानाही गावातील महिला गरोदर राहत आहेत.
या गावात एकही पुरुष राहत नाही आणि पुरुष येत नसताना गावातील महिला गरोदर कशा राहतात, हे सर्वांसाठी गूढच राहिले आहे. चला तर मग जाणून घेऊया यामागील खरं सत्य. काटेरी कुंपणाने वेढलेले, केनियातील सांबुरू येथील उमोजा गाव हे जगातील सर्वात अनोखे गाव आहे. या गावात पुरुषांना प्रवेश बंदी असल्याने गेल्या 27 वर्षांपासून येथे केवळ महिलाच राहत आहेत.
कारण 1990 मध्ये ब्रिटीश सैनिकांनी बलात्कार केलेल्या 15 महिलांसाठी हे गाव निवडले होते. यानंतर हे गाव पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांचे माहेरघर बनले. पुढे बलात्कार, बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, खतना अशा सर्व प्रकारच्या हिंसाचाराला तोंड देणाऱ्या महिलांनी या गावात आपला आश्रय घेतला.
गावातील महिलांकडून प्रवेशद्वारावर निश्चित केलेले प्रवेश शुल्क आकारले जाते, त्यातून या गावातील सर्वांचा खर्च भागविला जातो. या गावातील महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर ती मुलांनाही जन्म देत आहे. त्याचे कारण म्हणजे ते गावाबाहेर चोरटे शारीरिक संबंध ठेवतात आणि आवडत्या पुरुषाशी शरीरसंबंध ठेवतात. अशा प्रकारे ती वंश चालवत आहे आणि शारीरिक सुखही मिळवत आहेत.
या गावात सध्या सुमारे 250 महिला व मुले राहतात. गावातील महिला एक प्राथमिक शाळा, सांस्कृतिक केंद्र आणि सांबुरु नॅशनल पार्कला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मोहीम स्थळ चालवत आहेत. या गावाची स्वतःची वेबसाइट देखील आहे. येथे राहणाऱ्या महिलाही गावाच्या फायद्यासाठी पारंपारिक दागिने बनवतात आणि विकतात. यासोबतच सफारीला येणाऱ्या पर्यटकांना या महिला त्यांचे गाव दाखवतात.